मुंबई : 2022 वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्ष 2023 च्या स्वागतासाठी सगळीकडे चांगलाच उत्साह दिसून येतो आहे. अनेकांचे रात्रीच्या सेलिब्रेशनचे प्लॅन्स तयार आहेत. वीकएंड असल्यानं काल संध्याकाळपासूनच महामार्गांवर वाहनांची वर्दळ वाढलेली दिसते आहे. प्रत्येकजण आाजच्या रात्रीच्या पार्टीच्या डेस्टिनेशन्सच्या ठिकाणाकडे वाटचाल करतायंत तर काही जणांनी आधीच निश्चित स्थळी पोहोचून सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे. यंदाचा 31st आपल्या मित्र मंडळींसोबत किंवा कुटुंबासोबत घालवण्यासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे.
कोकणात गर्दी, समुद्रकिनारे फुलले :
नवी मुंबई (महाराष्ट्र): नवी मुंबई से रायगढ़ तक ट्रैफिक जाम लगा। #NewYear2023 pic.twitter.com/JYziuB7jHF
— ANI_HindiNews (@AHindinews) December 31, 2022
गेल्या आठवड्यापासूनच कोकणात येणारी पर्यटकांची गर्दी चांगलीच वाढलेली आहे. थोडीफार असलेली थंडी आणि समुद्र किनाऱ्यांवर लाटांचा अनुभव घेण्यासाठी गर्दी होताना दिसतेय. कोकणाच्या परिसरात रिसॉर्ट, हॉटेलल्स हाऊसफुल्ल झालीयेत. रत्नागिरी आणि तळकोकणात समुद्रकिनाऱ्यांवर इयर एंड घालवण्याचा कल वाढताना दिसतो आहे.
हिल स्टेशन्स पर्यटन स्थळीही गर्दी :
याचबरोबर हिल स्टेशन्स आणि पर्यटन स्थळांवरही गर्दी होतेय. माथेरान, वाई, महाबळेश्वर, तोरणमाळ, त्रंबकेश्वर अशा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढलेलेी आहे. कुटुंबासोबत वीक एन्ड घालवत नव्या वर्षांचं उत्साहात स्वागत करण्याचा ट्रेन्ड दिसतोय. अनेक धरणांच्या परिसरातही टेन्ट संस्कृतीही रुजताना दिसतेय. निसर्गाच्या समवेत राहून सरत्या वर्षाला निरोप देण्याचा अनेकांचा मानस आहे.
तीर्थक्षेत्रंही फुलली :
सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाच्या स्वागताला देवदर्शन घेण्यासाठी बरेच जण घराबाहेर पडले आहेत. शि[blurb content=””][blurb content=””]र्डी, सप्तशृंगी, अष्टविनायकांची ठिकाणं अशा ठिकाणी गर्दी वाढते आहे. नवीन वर्ष आनंददायी जावं यासाठी परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अनेक जण जातायेत.
नॉनव्हेज, ड्रिंक्सची रेलचेल :
रात्रीची तयारी जोरता सुरु झालीय. ड्रिंक्ससाठीचे पर्याय अनेकांनी आधीच आणून ठेवलेत. तर काही जण ते घेण्यासाठी दुकानांमध्ये येतायेत. त्यामुळं वाईन शॉपही ओसंडून वाहताना दिसतायेत. तर रात्रीच्या पार्टीसाठी चिकन-मटणची मागणीही वाढलेली आहे. दुकानांबाहेर सकाळपासूनच अनेकांच्या रांगा लागलेल्या दिसतायेत. अनेकांचा शनिवार असला तरी मध्यरात्रीनंतर किंवा उद्या चिकन-मटणावर ताव मारण्याचा अनेकांचा विचार आहे. चांगल्या हॉटेल्समधून खाद्यपदार्थ मागवण्यावरही अनेकांचा भर आहे.