
Devendra Fadnavis, Navbharat interview, BMC Election, Municipal Corporation Elections Maharashtra,
यावेळी त्यांनी ठामपणे सांगितले की मुंबई, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि नवी मुंबईसह किमान २६ महानगरपालिकांमध्ये महायुती सत्तेत येईल आणि महायुतीचाच महापौर होईल. महायुती सत्तेत आल्यानंतर ते बीएमसीमधील २५ वर्षांचा भ्रष्टाचार दूर करण्यासाठी व्यापक प्रशासकीय फेरबदल केले जातील असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
शिवाजी पार्कवर राज आणि उद्धव यांच्या सभेचा काही फरक पडू शकतो, या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, “दुसऱ्या दिवशी त्याच मैदानावर आम्ही त्यांच्या सर्व टिकांवर प्रतिक्रिया दिली. आमच्या उत्तरांनंतर राज ठाकरे बचावात्मर भूमिकेवर आले. तुम्ही राज ठाकरेंचे पुढील भाषण पाहिले, तर सर्व स्पष्ट होईल. जर तुम्ही प्रतिउत्तर दिले नाही तर लोकांना नॅरेटिव्ह सेट करण्याची संधी मिळते. २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये आम्ही उद्धव ठाकरेंविरुद्ध निवडणुका लढवल्या आणि अधिक जागा जिंकल्या होत्या.
पूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या विरोधात होते, मात्र आता ते त्यांच्यासोबत निवडणूक लढवत आहेत. मात्र या युतीमुळे मनसेला फारसा राजकीय फायदा होईल, असे वाटत नसल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
राज ठाकरे यांचा निवडणुकीच्या राजकारणात मर्यादित प्रभाव राहिला आहे. त्यांनी यापूर्वी काँग्रेससोबत युती करून निवडणुका लढवल्या, मात्र त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. एकटे लढले तरी परिस्थिती बदलली नाही. आता उद्धव ठाकरेंसोबत युती केल्याने मुंबईत उद्धव ठाकरेंना काही प्रमाणात फायदा होऊ शकतो, मात्र राज ठाकरेंना त्यातून विशेष लाभ होणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Delhi Fire News : भाजप नेते रविशंकर प्रसाद यांच्या अचानक घराला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
या निवडणुकीत मुस्लिम मतदार काँग्रेसऐवजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतात,यावर बोलताना फडणवीस म्हणाले, असे होऊ शकते. कारण अलिकडच्या काळात हाच प्रकार दिसून आला आहे. भाजपला पराभूत करण्यास सक्षम असलेल्या पक्षाला पाठिंबा देण्यास मुस्लिमांचा कल अधिक वाढला आहे.
जागावाटपात, तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेला जास्त जागा दिल्या, यावरही फडणवीस यांनी उत्तर दिले. “जेव्हा तुम्ही युतीमध्ये पुढे जाता तेव्हा तुम्हाला अनेकदा तडजोड करावी लागते. कल्याण-डोंबिवलीमध्ये आमची ताकद ५% जास्त असते. पण आम्ही तिथे तडजोड केली आहे. जळगावमध्ये आमचे ५७ नगरसेवक होते, पण आम्ही ४७ जागांसाठी निवडणूक लढवत आहोत. युतींमध्ये हे सामान्य आहे.”
विकासाच्या मुद्द्यांवरून तुम्ही अचानक मराठी महापौरांकडे कसे वळलात,”कधीकधी आरोप आणि दाव्यांचे उत्तर देणे आवश्यक होते. मुंबईबाहेरील कोणीतरी आमचे नेते कृपाशंकर सिंह यांना उत्तर भारतीय महापौरांबद्दल विचारले. “ठाकरे बंधुंच्या युतीकडून उत्तर भारतीय नगरसेवक निवडणूक जिंकले तर एक उत्तर भारतीय महापौर होऊ शकतो, असा प्रचार सुरू केला. पण त्यांचे विधान मुंबईत प्रसिद्ध झाले, त्यामुळे याबाजूने एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न झाला. एमआयएमने बुरखाधारी महापौराचा मुद्दा उपस्थित करण्यास सुरुवात केली. म्हणून, मी लोकांना आश्वासन दिले की मुंबईचा महापौर हिंदू-मराठी असेल.
बैठकीचा तपशील: मुंबई-7, नागपूर-5, पुणे-2, आणि इतर-प्रत्येकी 1: सांगली, अकोला, जालना, परभणी, नांदेड, धुळे, लातूर, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, अहिल्यानगर, वसई विरार, मीरा भाईंदर, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, मुंबई/नाशिक
रोड शो: इचलकरंजी, चंद्रपूर, अमरावती, जळगाव, पिंपरी चिंचवड, नागपूर
एकूण 37 सभा
रोड शो 77 एकूण कार्यक्रम