Video Viral: फोर्ड प्लांटमध्ये ट्रम्पचा राग अनावर; 'पीडोफाईल प्रोटेक्टर ' म्हणणाऱ्या माणसाकडे पाहून केले आक्षेपार्ह हावभाव ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Donald Trump Ford plant viral video 2026 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र, नुकत्याच मिशिगनमधील एका कार्यक्रमात त्यांच्या रागाचा असा काही कडेलोट झाला की, त्यांनी राष्ट्रपतीपदाची प्रतिष्ठाही बाजूला ठेवली. मिशिगनमधील डिअरबॉर्न येथील फोर्ड कारखान्यात एका अज्ञात व्यक्तीने ट्रम्प यांना “पीडोफाईल प्रोटेक्टर” (Pedophile Protector) म्हणून हिणवले, ज्यावर संतप्त होऊन ट्रम्प यांनी त्या व्यक्तीच्या दिशेने आक्षेपार्ह हावभाव केले. हा ३० सेकंदांचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वणव्यासारखा पसरत असून जगभरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे त्यांच्या ‘मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी’चे प्रदर्शन करण्यासाठी मिशिगनमधील प्रसिद्ध रिव्हर रूज कॉम्प्लेक्सला भेट देत होते. तिथे ते F-150 पिकअप ट्रकच्या उत्पादन युनिटची पाहणी करत असताना गर्दीतून अचानक एका माणसाने ओरडून त्यांच्यावर वैयक्तिक आणि गंभीर टीका केली. “पीडोफाईल प्रोटेक्टर” हा शब्द कानावर पडताच ट्रम्प थांबले, त्यांनी मागे वळून पाहिले आणि रागाच्या भरात आपली मधली बोट (Middle Finger) वर करून आक्षेपार्ह हावभाव केला. या घटनेने तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
#EXCLUSIVE 😳 President Trump was filmed flipping off a Ford worker who yelled “pedophile protector” at him. https://t.co/m5nLYtWxxT pic.twitter.com/512zEYV6WC — TMZ (@TMZ) January 13, 2026
credit : social media and Twitter
हा वाद अशा वेळी समोर आला आहे जेव्हा अमेरिकेत जेफ्री एपस्टाईन घोटाळ्याशी संबंधित नवीन सरकारी नोंदी सार्वजनिक केल्या जात आहेत. राजकीय विश्लेषकांचे असे मत आहे की, या कागदपत्रांमध्ये नाव येण्याच्या भीतीने ट्रम्प सध्या मानसिक दबावाखाली असावेत, ज्याचा परिणाम त्यांच्या वर्तनावर दिसून येत आहे. विरोधकांनी तर असाही आरोप केला आहे की, लोकांचे लक्ष या वादापासून विचलित करण्यासाठीच ट्रम्प यांनी अलीकडे व्हेनेझुएलावर लष्करी दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Arctic Warfare: ‘आम्ही आमचे निर्णय स्वतः…’, PM Nielsen यांची नूक मधून गर्जना; ट्रम्पच्या ‘रियल इस्टेट’ डीलला Greenlandचा ठेंगा
या घटनेनंतर सर्वत्र टीका होत असताना व्हाईट हाऊसने मात्र ट्रम्प यांचा बचाव केला आहे. कम्युनिकेशन्स डायरेक्टर स्टीव्हन चेंग यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “राष्ट्राध्यक्षांना मुद्दाम चिथावणी देण्यासाठी काही लोकांनी हा सापळा रचला होता. एका वेड्या माणसाने जेव्हा मर्यादा ओलांडली, तेव्हा ट्रम्प यांनी केवळ स्पष्ट आणि अचूक पद्धतीने त्याला उत्तर दिले.” चेंग यांच्या मते, ही एक ठरवून केलेली बदनामीची मोहीम आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: मध्यपूर्वेत महायुद्धाची नांदी? Donald Trump यांच्या एका इशाऱ्यानंतर ‘हे’ आठ मुस्लिम देश आता इराणच्या रडारवर
डोनाल्ड ट्रम्प यांचे हे पहिलेच आक्षेपार्ह कृत्य नाही. यापूर्वी अनेक वेळा त्यांनी कॅमेऱ्यासमोर अपशब्द वापरले आहेत. गेल्या वर्षी इस्रायल-इराण युद्धबंदीच्या चर्चेदरम्यान त्यांनी उघडपणे ‘एफ-शब्द’ वापरून राजनैतिक वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. ट्रम्प समर्थकांना त्यांचे हे वागणे “धाडसी” आणि “खरेपणाचे” वाटते, तर टीकाकारांच्या मते हे वागणे जागतिक महासत्तेच्या नेत्याला शोभणारे नाही.






