या निवडणुकीत मुस्लिम मतदार काँग्रेसऐवजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतात,यावर बोलताना फडणवीस म्हणाले, असे होऊ शकते. कारण अलिकडच्या काळात हाच प्रकार दिसून आला आहे.
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) २२७ जागांसाठी १,७०० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण उमेदवारांपैकी ८७९ महिला आणि ८२१ पुरुष आहेत.
भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) प्रचारसभेचा रंग चढू लागला आहे. अशातच शनिवारी रात्र नारपोली भंडारी चौकात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी २८ उमेदवारांनी माघार घेतली. आज या माघारीनंतर निवडणूक रिंगणात ४७७उमेदवार राहिले आहेत. अर्ज मागे घेण्यास उद्या शुक्रवारी अखेरचा दिवस आहे.
गेल्या २५ वर्षांपासून मी भाजपचं काम करत आहे. तुला तिकीट देतो अस त्यांनी सांगितलं होतं. पण त्यांनी सावेंच्य पीए ला तिकीट दिलं. भागवत कराड यांनी त्यांच्या जातीच्या माणसाला तिकीट दिलं.
भारतीय जनता पार्टीचे नेते दिवंगत अंकुश लांडगे यांचे पुतणे रवी लांडगे आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक राजेंद्र लांडगे यांच्या पॅनल असणार आहे. या प्रभागात राष्ट्रवादी, शिवसेना नेते…
लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, यासोबतच नगरसेवकपदासाठी त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना तिकीट देऊन भाजपनं घराणेशाहीचीच परंपरा पुढे चालवली.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला चपराक दिली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे गटाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी पक्षाच्या तयारीबाबत माहिती दिली.