Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इतिहासप्रेमींसाठी पर्वणी! मुंबईतील ‘या’ वस्तुसंग्रहालयात 5 हजार वर्षाचा इतिहास अनुभवायला मिळणार, आजच द्या भेट

सुमारे 5 हजार वर्षांपूर्वीचा जगभरातील इतिहास आता पुन्हा नव्या रुपाने शाळकरी मुलं आणि इतिहासप्रेमींना अनुभवता येणार आहे. जर तुम्ही देखील इतचिहासप्रेमी असाल तर मुंबईतल्या वस्तुसंग्राहलाला नक्की भेट द्या.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 13, 2025 | 03:39 PM
इतिहासप्रेमींसाठी पर्वणी! मुंबईतील ‘या’ वस्तुसंग्रहालयात 5 हजार वर्षाचा इतिहास अनुभवायला मिळणार, आजच द्या भेट
Follow Us
Close
Follow Us:
  • इतिहासप्रेमींसाठी पर्वणी!
  • 5 हजार वर्षाचा इतिहास अनुभवायला मिळणार
  • मुंबईत जागतिक पातळीवरील स्टडी गॅलरी सुरू
मुंबई : असं म्हणतात इतिहासाची जितकी पाळंमुळं शोधायला जाऊ तितकी त्याची रहस्य अजूनच वाढत जातात. असाच सुमारे 5 हजार वर्षांपूर्वीचा जगभरातील इतिहास आता पुन्हा नव्या रुपाने शाळकरी मुलं आणि इतिहासप्रेमींना अनुभवता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS), मुंबई येथे ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट : अ स्टडी गॅलरी ऑफ इंडिया अँड द एन्शंट वर्ल्ड’ हे नवीन दालन शुक्रवारी 12 डिसेंबर 2025 रोजी सुरू झाले. भारतातील प्रेक्षकांसाठी प्रथमच जागतिक स्तरावर निवडलेली एक भव्य शैक्षणिक दालन मुंबईत खुले झाले आहे. सुमारे 5 हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन जगाचा परस्परसंबंध व्यापार, लेखन, धर्म, कला आणि विचारांच्या देवाणघेवाणीमुळे कसा घडला याची सखोल ओळख प्रेक्षकांना या दालनातून मिळणार आहे.

इतिहास शिकवण्यास प्रोत्साहन देणे, दालनाचा मुख्य हेतू

या ऐतिहासिक उपक्रमात भारत, इजिप्त, मेसोपोटेमिया, ग्रीस, रोम, पारस आणि चीन तसेच अविभाजित भारताच्या प्रांतांमधील संस्कृतींच्या कथा सांगणाऱ्या सुमारे 300 निवडक पुरातत्त्वीय वस्तूंचा समावेश आहे. सिंधू–सरस्वती (हडप्पा) संस्कृतीपासून सुरू होणाऱ्या या प्राचीन वारशाद्वारे भारतभरातील विद्यापीठे आणि शाळांना वस्तूंमधून इतिहास शिकवण्यास प्रोत्साहन देणे हा या दालनाचा मुख्य हेतू आहे.

गेल्या चार वर्षांपासून राबविलेल्या या महत्त्वपूर्ण प्रयत्नाला Getty च्या ‘शेअरिंग कलेक्शन्स प्रोग्रॅम’चे सहकार्य लाभले आहे. CSMVS आणि त्याचे दीर्घकालीन भागीदार ब्रिटिश म्युझियम, लंडन यांच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचा हा परिणाम आहे. तसेच स्टॅटलिशे म्युजेअन सु बर्लिन, म्युझियम रिएटबर्ग (झुरिच), आणि प्रथमच बेनकी म्युजियम (अथेन्स), अल-सबाह कलेक्शन (कुवेत), तसेच इफोरेट ऑफ अँटिक्विटीज ऑफ द सिटी ऑफ अथेन्स यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.

Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास

या प्रकल्पास भारत सरकारच्या संस्कृति मंत्रालयाचे समर्थन प्राप्त झाले असून, पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI), राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली, अलाहाबाद संग्रहालय प्रयागराज, महाराष्ट्र शासनाचे पुरातत्त्व व संग्रहालय विभाग, इंडियन म्युझियम कोलकाता, बिहार संग्रहालय पटना, शासन संग्रहालय मथुरा आणि राज्य संग्रहालय लखनौ या संस्थांच्या समृद्ध संग्रहातील बहुमूल्य प्राचीन वस्तूंचाही समावेश आहे.

भारत आणि जगातील 15 महत्त्वपूर्ण संग्रहालयांमधील 300 हून अधिक अप्रतिम पुरातत्त्वीय वस्तूंच्या माध्यमातून प्राचीन भारताची जगाशी असलेली सांस्कृतिक, व्यापारी आणि वैचारिक नाळ उलगडून दाखवणारा हा एक क्रांतिकारी उपक्रम आहे. मानवजातीने एकमेकांसोबत राहणे, विचारांची देवाणघेवाण करणे आणि ज्ञान व संस्कृतीची दीर्घकालीन परंपरा उभारणं  याचा अद्वितीय प्रवास या दालनात पाहायला मिळेल. या कथा वेगळ्या असल्या, तरी त्या एकमेकांशी निगडित आणि सामायिक मानवी इतिहासाचा भाग आहेत. प्राचीन जग आपल्या वर्तमानाची पायाभरणी आहे आणि आजही आपल्यावर प्रभाव टाकते. इतिहास समजून घेण्यासाठी जागतिक दृष्टीकोन आवश्यक आहे.” महासंचालक, CSMVS   सब्यसाची मुखर्जी यांनी सांगितलं आहे.

“आज संग्रहालये केवळ वस्तू जतन करणारी ठिकाणे नाहीत, इतिहासाशी निगडीत शिक्षण, संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीची केंद्रे आहेत. ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट’ जगभरातील संग्रहांना एकत्र आणत प्राचीन संस्कृतींमधील पाळमुळं जाणून घेण्यास मदत करतं. या उपक्रमाला पाठिंबा देताना आनंद आहे. कलाकृती नव्या संदर्भात पाहिल्या की नवीन नाती, नवे विचार आणि नवीन दृष्टीकोन निर्माण होतात.”
— डॉ. कॅथरीन ई. फ्लेमिंग, अध्यक्ष आणि CEO, जे. पॉल गेट्टी ट्रस्ट

IAS Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंना ‘क्लिन चिट’; आमदार खोपडेंनी केलेली ‘ती’ मागणीही फेटाळली

💡

Frequently Asked Questions

  • Que: दालनाचा मुख्य हेतू काय ?

    Ans: या ऐतिहासिक उपक्रमात भारत, इजिप्त, मेसोपोटेमिया, ग्रीस, रोम, पारस आणि चीन तसेच अविभाजित भारताच्या प्रांतांमधील संस्कृतींच्या कथा सांगणाऱ्या सुमारे 300 निवडक पुरातत्त्वीय वस्तूंचा समावेश आहे. सिंधू–सरस्वती (हडप्पा) संस्कृतीपासून सुरू होणाऱ्या या प्राचीन वारशाद्वारे भारतभरातील विद्यापीठे आणि शाळांना वस्तूंमधून इतिहास शिकवण्यास प्रोत्साहन देणे हा या दालनाचा मुख्य हेतू आहे.

  • Que: कोणकोणत्या प्राचीन संस्कृतींचा समावेश आहे?

    Ans: भारत (सिंधू–सरस्वती/हडप्पा संस्कृती), इजिप्त, मेसोपोटेमिया, ग्रीस, रोम, पारस, चीन तसेच अविभाजित भारतातील विविध प्रांतांच्या संस्कृतींचा समावेश आहे.

  • Que: भारतातील कोणत्या संस्थांचा सहभाग आहे?

    Ans: भारत सरकारचे संस्कृति मंत्रालय, ASI, राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली, अलाहाबाद संग्रहालय, महाराष्ट्र शासनाचा पुरातत्त्व व संग्रहालय विभाग, इंडियन म्युझियम कोलकाता, बिहार संग्रहालय पटना, मथुरा व लखनौ येथील संग्रहालयांचा सहभाग आहे.

Web Title: Experience 5000 years of history at the chhatrapati shivaji maharaj museum in mumbai visit today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • India History
  • Mumbai

संबंधित बातम्या

शैक्षणिक धोरणात महत्त्वपूर्ण तरतुदी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले प्रतिपादन
1

शैक्षणिक धोरणात महत्त्वपूर्ण तरतुदी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले प्रतिपादन

“इंडि आघाडीसोबत जाऊन उबाठा जिहादी मानसिकतेचे झाले…”, संजय निरुपम यांची घणाघाती टीका
2

“इंडि आघाडीसोबत जाऊन उबाठा जिहादी मानसिकतेचे झाले…”, संजय निरुपम यांची घणाघाती टीका

Mumbai Drug Case: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १० महिन्यांत ₹६७९ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त
3

Mumbai Drug Case: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १० महिन्यांत ₹६७९ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त

Mumbai Missing Girl: मुंबईला कोणाची नजर लागली? 268 मुली गायब, तर 82 मुले बेपत्ता, मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर
4

Mumbai Missing Girl: मुंबईला कोणाची नजर लागली? 268 मुली गायब, तर 82 मुले बेपत्ता, मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.