मुंबई – शिवसेनेतल्या बंडानंतर आज बुधवारी होणारा दसरा मेळावा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वार्थाने ऐतिहासिक असणार आहे. शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ५६ वर्षांपूर्वी ३० ऑक्टोबर १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरेंनी घेतला. आज त्या ठाकरेपुत्राला पक्ष हातून जाऊ नये म्हणून धडपड करावी लागतेय. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे उभ्या देशाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राचे लचके तोडून मुंबईला खिळखिळे बनविण्याचे काम सुरू. फॉक्सकॉन-वेदांता हा हातातोंडाशी आलेला घास गुजरातला गेला. स्वाभिमानी मराठी माणूस हे सहन करणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याऐवजी नागपूरची चौकशी करावी.
आपली बस योजनेला शंभर कोटी देण्याचा घाट घातल्याचा सुभाष देसाईंचा आरोप.सध्या लोक सरकारमध्ये बसल्याचा आव आणतायत. मात्र, हे सरकार मराठी भाषेबद्दल उदासीन असल्याचे उच्च न्यायालय म्हणते आहे. मराठीला वर्गाच्या बाहेर ठेवले आहे. एवढी अवहेलना शिंदे सरकारच्या काळात. हे कुडमुडे सरकार काढून टाका. उद्धव ठाकरेंना दगा देणाऱ्यांची किव करावी तेवढी थोडी. उद्धव ठाकरेंनी जगाला हेवा वाटावे असे मुख्यमंत्रीपद सांभाळले. अशी टीका सुभाष देसाई यांनी केली.