Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur news: ट्रस्टच्या नावावर बनावट बिले; विकासकामांचा निधी लाटला; मनसेचे गंभीर आरोप

कळमना येथील खसरा क्रमांक २३ आणि २८/१अ मधील भूखंड क्रमांक १९ ते २४ पर्यंतच्या भूखंडधारकांकडून तब्बल १२ लाख रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 01, 2025 | 09:15 AM
Nagpur News

Nagpur News

Follow Us
Close
Follow Us:

Nagpur News:  पूर्व नागपूर येथील ट्रस्टच्या विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग असिस्टंट सुरेश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ट्रस्टच्या एका कार्यक्रमात त्यांच्यावर काळे फासण्यात आल्याचा प्रकारही घडला. या प्रकारामुळे केवळ मुख्यालयातच नव्हे, तर सर्वच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली १३ सप्टेंबर २०२३ रोजी ट्रस्टवर मोर्चा नेण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष मनोज सूर्यवंशी यांना निवेदनही देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे.

‘चव्हाण हे गेली १० वर्षे पूर्व नागपूर कार्यालयात कार्यरत असून या काळात त्यांची एकदाही बदली झालेली नाही. त्यांनी या काळात विविध प्रकरणांमध्ये गंभीर अनियमितता केल्याचा’ मनसेने आरोप केला आहे. विशेषतः चिखली (देव) येथील ट्रस्टच्या मालकीच्या खसरा क्रमांक ८३, ८४/१ वर अतिक्रमण करणाऱ्यांकडून भूखंड वाटपाचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळल्याचा आरोप मनसेने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे.

परभणी-संभाजीनगर दरम्यानचे अंतर कमी होणार; रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी 2179 कोटींची मंजूरी

सरकारकडून विकासकामांसाठी मिळालेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला आहे. भानखेडा (मध्य नागपूर) येथे सिमेंट रस्ता प्रत्यक्षात बांधला न गेल्याचे स्पष्ट असून, महापालिकेने केलेल्या कामांना ट्रस्टच्या विकासकामांचा भाग असल्याचे दाखवून बनावट बिले तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात काही कंत्राटदारांशी संगनमत करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.

याशिवाय, कळमना येथील खसरा क्रमांक २३ आणि २८/१अ मधील भूखंड क्रमांक १९ ते २४ पर्यंतच्या भूखंडधारकांकडून तब्बल १२ लाख रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या भूखंडधारकांना बनावट आरएल (Residential Layout) प्रमाणपत्रे देण्यात आली आणि खोट्या मंजुरीच्या आधारे बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली. या प्रकरणामुळे ट्रस्टच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि राजकीय पक्षांकडून होत आहे.

भांडेवाडी टी.क्र.०३ येथे १२ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. ट्रस्टचे आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग असिस्टंट सुरेश चव्हाण यांनी प्रत्यक्ष कोणतेही काम न करता बनावट बिले तयार केली आणि अधिकाऱ्यांना खोटी माहिती देऊन स्वतः व काही कंत्राटदारांना आर्थिक फायदा करून दिल्याचे उघड झाले आहे. मनसेच्या आरोपानुसार, लाभ घेणाऱ्या कंत्राटदाराकडून चव्हाण यांनी नारा येथील खसरा क्रमांक १४८/२ मधील भूखंड क्रमांक ११८ आणि ११९ हे त्यांच्या पत्नीच्या बहिणीच्या नावावर करून घेतले. या व्यवहारात त्यांच्या आर्थिक गैरप्रवृत्तीचा स्पष्ट प्रत्यय येतो.

Manikrao Kokate: अखेर कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ मंत्रीपदावरून व्हावे लागले पायउतार; मुख्यमंत्र्यांनी

चव्हाण यांनी ट्रस्टमध्ये काही वर्षांच्या सेवेतच कोट्यवधी रुपयांची जंगम व अचल मालमत्ता जमा केली असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः चिखली येथील ट्रस्टच्या औद्योगिक वापरासाठी असलेल्या भूखंडधारकांना बनावट नोटिसा पाठवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची वसुली करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात तत्कालीन अध्यक्षांना काही पुरावे व संबंधित भूखंडांची प्राथमिक यादी देखील सादर करण्यात आल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर, प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

पूर्व नागपूर ट्रस्टमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशाकडेही दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे. मनसे नेते उमेश उटखेडे, संदीप देशपांडे आणि इतरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुद्दा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत नेण्यात आला होता. दोघांनाही निवेदन सादर करण्यात आले होते. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्रस्टला तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी हे आदेश धाब्यावर बसवून कोणतीही कार्यवाही केली नाही. उलट, काही राजकीय व्यक्ती आणि ट्रस्टमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्याची पूर्व विभागीय कार्यालयातच परत बदली करण्यात आली.

या विरोधात मनसेकडून १८ जुलै २०२५ रोजी पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने मनसेचे उमेश उटखेडे यांनी अखेर संबंधित अधिकाऱ्याला जाहीरपणे कलंकित केल्याचे सांगितले. मनसेने या प्रकाराला “शासन यंत्रणेतील निष्क्रियता आणि भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण” ठरवत दोषींवर त्वरित व कठोर कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.

 

Web Title: Fake bills in the name of the trust scam of development funds mns makes serious allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 09:13 AM

Topics:  

  • Nagpur News

संबंधित बातम्या

नागपूर शहरात 20 ऑगस्टपासून ट्रॅव्हल्स बसेसना ‘नो एंट्री’; पोलिस आयुक्तांनीच काढले आदेश
1

नागपूर शहरात 20 ऑगस्टपासून ट्रॅव्हल्स बसेसना ‘नो एंट्री’; पोलिस आयुक्तांनीच काढले आदेश

अजब-गजब ! शिक्षण विभागातील तब्बल 45 फाईल्स झाल्या गायब; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ
2

अजब-गजब ! शिक्षण विभागातील तब्बल 45 फाईल्स झाल्या गायब; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ

पूर्ण गुण मिळूनही विद्यार्थी ‘नापास’; नागपूर विद्यापीठाच्या चुकीचा विद्यार्थ्याला फटका
3

पूर्ण गुण मिळूनही विद्यार्थी ‘नापास’; नागपूर विद्यापीठाच्या चुकीचा विद्यार्थ्याला फटका

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत
4

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.