वाळूज : वडगाव कोल्हाटीमध्ये ५०० रूपयांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या तिघांवर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून २० हजारांच्या नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमाई चौक, वडगाव कोल्हाटी येथे बनावट नोटा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक पाथरकर यांच्या पथकाने छापा टाकून राजू उत्तम गवई यांच्या घरामध्ये झाडाझडती घेतली असता एका पेपरवर ४ अशा ५०० रूपयांच्या नोटा असलेले पेपर जप्त केले. सुमारे ५५ पेपरचा यात समावेश आहे. हुबेहूब ५०० रूपये बनावटी चलन एका बाजूने छपाई केलेले ४५४ पेपर जप्त करण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता यात राजू गवई याच्यासह सुभाष भावराव घुले, रामराव अशोक बोराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करत आहेत.