नाशिक : गेल्या दीड-दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोचे (Tomato Prices) भाव गगनाला भिडले होते. प्रतिकिलो दर 150 ते 200 रुपयांवर पोहोचला होता. यामुळे अनेक शेतकरी लखपती झाले. पण आता हाच टोमॅटो फुकट वाटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोमॅटोला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सिन्नर तालुक्यातील हिवरगाव (घंगाळवाडी) येथील शेतकऱ्यांनी झोपडपट्टीतील गरजूंना तसेच रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना फुकट टोमॅटो वाटले आहे. हिवरगाव-वडांगळी रस्त्यावर हिवरगाव (चंगाळवाडी) येथील शेतकऱ्यांनी सुमारे 150 नागरिकांना मोफत टोमॅटो वाटले. बाजारभाव नसल्याने शासनाने लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे केले आहे. हजारो शेतकऱ्यांच्या टोमॅटोला सध्या मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच नैराश्येत आहे. यातूनच शेतकऱ्यांनी शासनाविरोधात रोष व्यक्त केला.
आधी फायदा, आता निराशा
टोमॅटोने काही दिवसांपूर्वी लाखोंचा फायदा मिळवून दिला होता. त्याचा राज्यभर गाजावाजा झाला. मात्र, आता देशात किमान 9 रुपये भाव मिळत आहे. टोमॅटोच्या भावात संपूर्ण देशभरात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी नैराश्येत आहेत.