Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जालन्यात शेतकरी मेटाकुटीला, परतीच्या पावसाची सरासरी 100 मि.मी. पेक्षा जास्त

जालन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस. परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. खरीप पिकाचीही वाट लागली आहे. यंदाचा पाऊस बराच लांबला असून शेतकऱ्यांचे जीव मेटाकुटीला आले आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 01, 2025 | 02:09 PM
जालन्यात पावसाचे थैमान (फोटो सौजन्य - iStock)

जालन्यात पावसाचे थैमान (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • गतवर्षी पेक्षा यंदा पाऊस लांबला
  • गतवर्षीपेक्षा यंदा १३३ मिमी पाऊस जास्त
  • सध्या कापणीचा हंगाम सुरू

जालनाः भोकरदन तालुक्यातील गतवर्षी पेक्षा १३३ मी मी पाऊस जास्त झाला असून सरासरीपेक्षा अधिक टक्के पाऊस जास्त पडला आहे. परतीच्या पावसाने हाती आलेले खरिपातील पीक हिरावून घेतले आहे. कापणी सुद्धा खोळंबली असली तरी उभी पीक आडवी झाली आहेत पंचनामे सुरू असले तरी प्रत्यक्षात किती मदत मिळेल याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यावर पावसाचे संकट कायम आहे.  परतीचा पाऊस लांबल्याने गुरुवारी देखील जालन्यातील भोकरदन शहरदार आणि परिसरात दुपारपासूनच पाऊस सुरू होता. दररोज अशीच पावसाची ढगांच्या गडगडाट सह वर्णी लागत आहे गेले काही दिवसात भोकरदन मध्ये परतीच्या पावसाची सरासरी १३३.२ मिमी पेक्षा जास्त नोंदवली गेली आहे तर केवळ जून ते ३० सप्टेंबर ५२७.७ मिमी नोंदविली गेली आहे.

रोजच तालुक्यात पाऊस लावतोय हजेरी

भोकरदन परिसरामाये झालेल्या अवकाळी पावसाने भरलेली केि मातीत गेली आहे. यावणी चामाला पाऊस झाल्याने पीक ही जोमाने फुलून आले होते. मात्र परतीच्या पावसाने घास हिरावून घेतल्याचे चित्र पाहवयास मिळाले पूर्ण खरीप हंगामात विविध संकटाना सामोरे जात येथील शेतकऱ्यांनी खरिपाची शेती पिकवली होती. मोठ्या कष्टाने चिकवलेले धान्य घरात आणण्याच्या शेवटच्या क्षणालाही पावसाने धांदल उडवल्याने शेतकरी चिंतातूर झाला. पावसाचा कोणताच अंदाज नसताना गेल्या काही आठवडा पासून दुपारनंतर पावसाने रंग दाखवण्यास सुरुवात केली.

तालुक्यातील सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडत असल्याचे नोंदणी निहाय दिसून येत असले तरी गेल्या चार-पाच वर्षे पासून तालुक्यातील पावसाची सरासरी कमी अधिक जास्त नोंदविली गेली आहे. पावसाने कापलेलों मका, सोयाबीन सुरक्षित ठिकाणी आणून ठेवण्यास संधीच दिली नाही.

कौतुकास्पद! एस. टी. सुरक्षारक्षकाची प्रामाणिकता; साडेतीन लाखांच्या लालसेवर माणुसकीचा विजय

जून ते ३० सप्टेंबरपर्यंत झालेला पाऊस

मंडळ वार्षिक सरासरी झालेला पाऊस
भोकरदन 546.5 826.6
सिपोरा बाजार 546.5 699
धावडा 546.5 700.6
अनवा 546.5 688.1
पिंपळगाव रे.. 546.5 693
हसनाबाद  546.5 634.4
राजुर 546.5 826.5
केदारखेडा 546.5 747.3
एकूण 546.5 727.7

दरम्यान ऑक्टोबर महिन्यात 82.5 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. भोकरदनमध्ये जून ते ३० सप्टेंबरपर्यंत ५२७.७ मिमी पडला पाऊस आहे. अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी पीक घरात आणण्याच्या उद्देशाने मका आणि सोयाबीन सोंगनीला सुरुवात केली होती, या पावसाचा सर्वाधिक फटका सौगणी करून शेतात ठेवलेल्या मका पिकाला बसला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी मक्का पाण्यात वाहताना दिसून आली तर मक्याची कणसे पूर्णपणे भिजून गेली आहेत. 

हवामान खराबामुळे शहरात साथरुग्णांच्या संख्येत वाढ

शहरासह तालुक्यात मागील दोन आठवड्यांपासून असलेले खराब हवामान, वादळी वारा, पाऊस, ढगाळ वातावरण व त्यात पावसाची सततधार अनेकांच्या मुळावर उठले आहे. शहरात साथ आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. प्रामुख्याने वृद्ध व बालकांना साथ आजारांनी घेरले असून, अनेक बागा सच्या तापाच्या रुग्णांनी दवाखाने हाउसफुल भरले आहेत. सध्या शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयातही बहुसंख्य रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लहान मुलांना प्रामुख्याने पेशी कमी होणे, कावीळ, सर्दी, खोकला, थंडी-ताप आदी आजारांनी हैराण केले आहे. खोकला मेडिकल दुकानातून कफ सिरप, सर्दीसाठी वापरल्या जाणाऱ्या बाम व पेनकिलरची विक्री वाढली आहे. अशातच मध्य प्रदेशातील कोलड्रिफच्या बळींनी व दर्जाहीन औषधांनी पालकांच्या पोटात गोळा उठला आहे.

“या विषयाला फुल स्टॉप द्या…मुंडेंच्या बचावासाठी मुख्यमंत्र्यांचे गुप्त आदेश”; जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप

नपा प्रशासन मात्र ढिम्म

या काळात सुरू असलेल्या खासगी रुग्णालयात मोठी गर्दी होत होती. जन्मजात बालकांनाही खराब हवामानाचा मोठा त्रास होत आहे. कावीळ, कफ, न्यूमोनिया अशा प्रकारचा त्रास होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले, या लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. वेळी घर व परिसरातील स्वछता, स्वच्छ व सांडपाण्याची डबकी याकडे त्याच लक्ष देतानाच जंतुनाशक औषध फवारणी आवश्यक असल्याचे नागरिक बोलत आहे शहरातील काही डॉक्टरांच्या मते पेशी कमी झालेले रुग्णही वाढले आहेत. यात सर्वच वयोगटातील रुगणांचा समावेश आहे. अशा परिस्थितीमुळे एखाद्या वेळेस डेंग्यूची साथ देखील येऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे.

महत्वाचे म्हणजे वृद्धांना ढगाळ वातावरणाचा मोठा डोके वर काढले अनेकांचा कार सततच्या संधिवात आहे. दम, आस्थमा, अॅलर्जी असलेले वृद्ध वस्त झाले अहेत. गुडघेदुखी व संधिवाताच्या वेदना असह्य होत आहेत, ढगाळ वातावरण, ऊन, वारा, पाऊस, सांडपाणी व अस्वच्छ पाण्याची डबकी, डासांचे साम्राज्य, आदि अनेक गोष्टी आजाराला कारणीभूत ठरत आहेनपा प्रशासनाचीही याबाबतची भूमिका डीम्म असल्यासारखी आहे. जनजागृतीसाठी कुठल्याही उपाययोजना नाही. घुर फवारणी बंद आहे. स्वच्छता मोहिमेचा बोजवारा उडाला आहे.

Web Title: Farmers in jalna are fed up the average rainfall is more than 100 mm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 02:09 PM

Topics:  

  • Jalna
  • jalna news
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव! हलक्या कापसाने बळीराजाचे टेन्शन वाढवले
1

Ahilyanagar News: शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव! हलक्या कापसाने बळीराजाचे टेन्शन वाढवले

Nanded News: 15 नोव्हेंबर 2025 पासून नांदेडमध्ये ‘या’ 2 बहुप्रतिक्षित विमानसेवा सुरु होणार
2

Nanded News: 15 नोव्हेंबर 2025 पासून नांदेडमध्ये ‘या’ 2 बहुप्रतिक्षित विमानसेवा सुरु होणार

कौतुकास्पद!  एस. टी. सुरक्षारक्षकाची प्रामाणिकता; साडेतीन लाखांच्या लालसेवर माणुसकीचा विजय
3

कौतुकास्पद! एस. टी. सुरक्षारक्षकाची प्रामाणिकता; साडेतीन लाखांच्या लालसेवर माणुसकीचा विजय

निष्काळजीपणाचा कळस! कळवा रुग्णालयात ऑक्सिजन वाहिनी बसवण्यास टाळाटाळ
4

निष्काळजीपणाचा कळस! कळवा रुग्णालयात ऑक्सिजन वाहिनी बसवण्यास टाळाटाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.