
Kavita Mule Jyoti Kalyankar Anuradha Kale frontrunners for in Nanded Municipal Corporation Mayor
Nanded News Update : नांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या महापौरपदाची (Nanded News) माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजपच्या वतीने महापौर पदाच्या उमेदवाराचे नाव उद्या शुक्रवारी अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौर पदासाठी अनेक महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत. यामध्ये सध्या कविता संतोष मुळे, ज्योती किशन कल्याणकर, अनुराधा राजू काळे, शांभवी प्रवीण साले, वैशाली मिलिंद न देशमुख आणि सुदर्शना महेश खोमणे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. (Political News)
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण जो निर्णय घेतील तोच अंतिम ठरेल, अशी भावना राजकीय वर्तुळात आहे. मात्र गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी, “महापौर पदाचा उमेदवार भाजपची कोअर कमिटी ठरवेल, असे स्पष्ट केल्याने सर्वांचे लक्ष आता कोअर कमिटीकडे लागले आहे.
हे देखील वाचा : नाशिक महापालिकेच्या महापौरपदी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी विलास शिंदे बिनविरोध
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे व संघटनमंत्री संजय कौडगे यांच्या उपस्थितीत गोपनीय बैठक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या बैठकीत महापौर पदासाठी योग्य उमेदवार कोण असावा, यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महापौर पदासोबतच उपमहापौर कोण होणार, याबाबतही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महापौर पदासाठी मराठा समाजातील उमेदवार दिल्यास उपमहापौर पद अन्य समाजाला दिले जाईल, असे राजकीय समीकरण मानले जात आहे. उपमहापौर पदासाठी आशिष नेरलकर, संजय घोगरे आणि सुमित मुथा यांची नावे आघाडीवर आहेत.
हे देखील वाचा : ही राजकीय नव्हे, विकासाची स्पर्धा…; दिल्लीतील भेटीगाठीबाबत खासदार अशोक चव्हाण यांची मार्मिक टिप्पणी
महापौरपदासाठी गुप्त पद्धतीने मतदान घ्या
स्थायी समिती सभापतीपदासाठी किशोर स्वामी यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा असून ते अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. महापौर, उपमहापौरपदासाठी भाजपने आठ, काँग्रेस, वंचित ने तीन तर एमआयएमने दोन अर्ज घेतल असल्याचे सांगण्यात आले असून उद्या प्रत्यक्षात कोण कोण अर्ज दाखल करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी काँग्रेस, राष्ट्रवादीने केली आहे.
५ हजार १०६ कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ
नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या एकुण ५ हजार १०६ कर्जदार शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील भू-विकास बँकेच्या कर्ज बोजाची नोंद कमी करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी २ फेब्रुवारी रोजी परिपत्रक निर्गमीत केले आहे. त्यानुसार जिल्हयातील संबंधित सर्व तहसिलदार यांना तालुक्यातील एकुण ५ हजार १०६ थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी देऊन सदर शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील भूविकास बँकेच्या (भु-तारण बँक, भूविकास बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बैंक मर्या. मुंबई) कर्जबोजाची नोंद कमी करण्याबाबत तसेच यासाठी सर्व तालुक्यानी मंडळस्तरावर कॅम्प आयोजित करावीत व कर्ज बोजाची नोंद कमी केल्याचे प्रमाणपत्र निर्गमीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नांदेड जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय बँक (भू-विकास बँक) नांदेड या बँकेची ८ मार्च २०२५ रोजीच्या आदेशान्वये नोंदणी रद्य झाली असुन महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय अन्वये राज्यातील सर्व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बैंक मर्या. मुंबई (शिखर भूविकास बँक) व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकाचे (जिल्हा भूविकास बँका) कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज पुर्णतः माफ झाले आहेत.