Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News: महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

अवैध निर्णयांवरील याचिकांवर प्रदीर्घ काळ निर्णय न घेणे हे वेळकाढूपणाचे धोरण असल्याचा आरोप महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समितीने केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2026 | 02:35 AM
Maharashtra News: महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
Follow Us
Follow Us:

सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची माहिती 
रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप
१ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येणार 

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या चार वर्षे मुदतीच्या १,५०० कोटींचे ६.९० टक्के महाराष्ट्र शासनाचे रोखे २०३० (४ फेब्रुवारी २०२६ रोजी उभारलेल्या) ची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाचे सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

MHADA Mumbai Lottery 2026: गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण?

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  १० फेब्रुवारी,२०२६ रोजी बॅंकेच्या फोर्ट , मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् १० फेब्रुवारी,२०२६ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ११ फेब्रुवारी,२०२६ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी चार वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ४ फेब्रुवारी,२०२६ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ४ फेब्रुवारी,२०३० रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ६.९० टक्के  दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ४ ऑगस्ट  आणि ४ फेब्रुवारी  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

Amravati News: अमरावतीत ७७ हजार ११९ एकल महिला, एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (एसएलआर) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

Web Title: Government of maharashtra is offering bonds worth 1500 crore with a four year maturity period sale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • economy
  • Maharashtra Govenment
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Home Credit India: महागडे शहर, पण आर्थिक नियोजन मजबूत! मुंबईकरांचा मासिक खर्च ₹२३ हजार; घरखरेदीला सर्वाधिक प्राधान्य
1

Home Credit India: महागडे शहर, पण आर्थिक नियोजन मजबूत! मुंबईकरांचा मासिक खर्च ₹२३ हजार; घरखरेदीला सर्वाधिक प्राधान्य

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज अन् पेपर नॅपकिन
2

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज अन् पेपर नॅपकिन

Rohit Pawar News: गुन्हेगारीत महाराष्ट्र यूपी, बिहारच्या पुढे!; जुन्नर प्रकरणावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
3

Rohit Pawar News: गुन्हेगारीत महाराष्ट्र यूपी, बिहारच्या पुढे!; जुन्नर प्रकरणावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

Rajapur News: श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दुर्लक्षित; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
4

Rajapur News: श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दुर्लक्षित; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.