Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यभर FDAची धडक कारवाई; Domino’sसह 11 आस्थापनांचे परवाने निलंबित, गुटख्याचा 1.25 कोटींचा साठा जप्त

महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत Domino’sसह 11 अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित केले. गुटखा-पान मसाल्याचा 1.25 कोटींचा साठा जप्त करत 15 जणांना अटक करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Aug 12, 2026 | 09:36 PM
tukaram Mundhe

tukaram Mundhe

Follow Us
Follow Us:
  • Domino’sच्या मुंबईतील तीन शाखांसह 11 अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित.
  • गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा तब्बल 1.25 कोटी रुपयांचा साठा जप्त.
  • दूध, तूप आणि Frozen Paneerसह इतर अन्नपदार्थांवरही कारवाई.
 

मुंबई : नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महाराष्ट्रभर विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. 10 जुलै ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये मोठ्या साखळी रेस्टॉरंट्सपासून हॉटेल, ढाबे, बेकरी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांपर्यंत अनेक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत Domino’s Pizzaच्या मुंबईतील तीन शाखांसह एकूण 11 अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

11 ऑगस्ट रोजी राज्यभरातील Chain Restaurantsवर विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. Domino’s, KFC, Pizza Hut, McDonald’s, Subway, Burger King, Starbucks आणि Monginis यांसारख्या साखळी आस्थापनांचा यात समावेश होता. एकूण 104 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन आस्थापनांचा व्यवसाय तात्काळ बंद करण्यात आला, तर 95 आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या.

मुंबईतील विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपर येथील Domino’s शाखांमध्ये स्वच्छता, अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, Pest Control, Food Safety Records आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात त्रुटी आढळल्या. त्यानंतर संबंधित परवाने निलंबित करण्यात आले.

माळरान तुडवत रोहित पाटलांची सिंचन योजनांची पाहणी; पंपहाऊसपासून पाइपलाइनपर्यंत घेतला आढावा

पुणे विभागात कराड येथील Domino’s आणि Sapphire Foods India Limitedच्या आस्थापनावरही कारवाई करण्यात आली. याशिवाय मुंबईतील दोन ढाबे आणि नाशिक, पालघरमधील काही हॉटेल-रेस्टॉरंटवरही परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

गुटखा-पान मसाल्यावरही मोठी कारवाई

प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विरोधातील विशेष मोहिमेत राज्यात 15 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. सर्व आस्थापनांमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळून आल्याने कारवाई करण्यात आली. एकूण 1 कोटी 25 लाख 96 हजार 727 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणांमध्ये 12 एफआयआर दाखल करण्यात आले असून 15 जणांना अटक करण्यात आली. तसेच 9 आस्थापना सील करण्यात आल्या आणि तीन वाहने जप्त करण्यात आली.

दूध, तूप आणि पनीरवरही कारवाई

रायगडमध्ये 698 लिटर संशयित निकृष्ट Pasteurised Cow Milk जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत सुमारे 1.34 लाख रुपये आहे. संबंधित व्यवसाय विना नोंदणी सुरू असल्याचेही तपासणीत आढळले.

Gondiya News: लाच घेताना वनपाल अडकला जाळ्यात! एसीबीची पारसटोला येथे धडक कारवाई; दोन वनरक्षकांनाही घेतले ताब्यात

नाशिकमध्ये 397.6 किलो संशयित निकृष्ट गायीचे तूप जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे 12.75 लाख रुपये आहे. अकोल्यातील Pizza Hutमधून 55 किलो Frozen Paneer जप्त करण्यात आले. हे पनीर चुकीच्या लेबलिंगचे आणि संशयित निकृष्ट दर्जाचे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना प्रतिबंधित किंवा संशयित निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक अथवा वाहतूक आढळल्यास तातडीने संबंधित प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Fda action maharashtra dominos gutkha food safety raid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • FDA Action
  • FDA Raid
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त
1

सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर
2

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.