
FDA Raid: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहीम, पुण्यातील वानवडीत दोन कराची स्वीट्सवर FDA ची धडक कारवाई
१० नोव्हेंबर २०२६ रोजी मेसर्स माँ कराची स्वीट्स मार्ट आणि मेसर्स श्री मोहन कराची स्वीट्स मार्ट या दोन युनिटांवर FDA च्या पथकाने छापे टाकले. या कारवाईत एकूण ९३ किलो संशयास्पद मिठाई जप्त करण्यात आली.
दोन्ही युनिटमधील मिठाईचा साठा कमी दर्जाचा किंवा आरोग्यास अपायकारक असण्याच्या संशयावरून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तिचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. जप्त करण्यात आलेला साठा हा नाशवंत स्वरूपाचा असल्याने कायदेशीर प्रक्रियेनुसार तो जागेवरच नष्ट करण्यात आला. या कारवाईत एकूण ५०,८६० रुपये किमतीचा साठा नष्ट करण्यात आला असून अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन्ही कराची स्वीट्स उत्पादक युनिटांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा अधिकारी पी. एन. चव्हाण आणि पी. जे. जाधव यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई पार पाडली. सहाय्यक आयुक्त एन. बी. खोसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह आयुक्त एस. आर. करकळे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे पुणे शहरातील इतर मिठाई व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहेत.
Ans: मेसर्स माँ कराची स्वीट्स मार्ट आणि मेसर्स श्री मोहन कराची स्वीट्स मार्ट या दोन युनिटांवर कारवाई करण्यात आली आहे.
Ans: या मोहिमेत एकूण ९३ किलो संशयास्पद मिठाई जप्त करण्यात आली असून त्यातील ५०,८६० रुपये किमतीचा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला.
Ans: राज्याच्या ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई पार पाडण्यात आली आहे.