Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त

FDA : एफडीएने धुळ्यात एका लक्झरी बसमधून 16 लाखांचा खवा जप्त केला आहे. विभागाला हा खवा भेसळयुक्त असल्याचा संशय असून त्यांनी त्याचे नमुने निरिक्षणासाठी पाठवले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 22, 2026 | 06:58 PM
FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त

Follow Us
Follow Us:
  • एफडीएची धडक कारवाई सुरुच
  • लक्झरी बस थांबवून लाखोंचा खवा जप्त
  • मावा कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षित
 

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विभागाकडून राज्यभरात करण्यात येणारी कारवाई. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (FDA) आयुक्तपदी विराजमान झाल्यापासून त्यांच्या विभागाने कारवाईचा सपाटाच लावला आहे. आता धुळ्यातून एक बातमी समोर येत असून एका लक्झरी बसमधून वाहतूक करण्यात येत असलेला खवा जप्त करण्यात आला असून त्या खव्याची किंमत चक्क 16 लाख 52 हजार रुपये एवढी आहे.

मुंढे यांच्या विभागाने भेसळयुक्त पदार्थ, हॉटेलमधील अस्वच्छता आणि अन्न व औषध विषयाच्या संदर्भातील सर्वच बाबतीत प्रामुख्याने लक्ष घातले आहे. विविध सणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही कारवाई वाढवली आहे. आता या विभागाने धुळे तालुका पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करत लक्झरी बसमधून वाहतूक करण्यात येत असलेला 5,385 रिवो मावा (खवा) जप्त केला आहे. याची किंमत चक्क 16 लाख 52 हजार 100 रुपये आहे. भेसळीच्या संशयावरून हा साठा जप्त करण्यात आला असून कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

अकोल्याकडे जात होती बस

प्राप्त माहितीनुसार, अहमदाबादहून अकोल्याकडे जाणाऱ्या अशोक लेलँड वेलकम लक्झरी बस क्रमांक MP-44-ZF-7214 यातून मिठाई बनवण्यासाठी लागणाऱ्या माव्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या सहाय्याने एफडीएने मोराणे हद्दीत, साक्री रोडवरील हॉटेल बालाजीजवळ सदर बस थांबवून तपासणी केली.
तपासणीदरम्यान बसमध्ये विविध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात मावा आढळून आला. त्यानंतर पुढील कारवाईसाठी हे वाहन टोल नाक्याजवळील दिसान कोल्ड स्टोरेज येथे आणण्यात आले.

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

विविध उत्पादनांचा समावेश

जप्त करण्यात आलेल्या प्रीमियम हलवा (ब्रजनिधी), प्रीमियम हलवा (गणेशा), इंडियन स्वीट हलवा (नंदि), स्वीट हलवा (खोडलं), हलवा (श्री ग्वाल), हलवा (श्री गोकुळ), स्वीट हलवा (गोपाल), ट्रॅडिशनल स्वीट (श्री ग्वाल), ट्रॅडिशनल स्वीट (श्री गोकुळ), इंडियन स्वीट (श्री गोपाल), कृष्णा हलवा, इंडियन डेझल्ट (नंदि) आणि प्रीमियम डेझल्ट (मीरा) या उत्पादनांचा समावेश आहे.

दरम्यान, विभागातील अधिकाऱ्यांकडून या धाडीनंतर सर्व नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला

Web Title: Fda raids luxury bus in dhule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • dhule news
  • FDA
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार
1

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
2

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.