सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एफडीएची धडक कारवाई! निकृष्ट अन्नावरून कॅन्टीन चालकाला नोटीस
मागील १५ दिवसापासून मुलींच्या वस्तीगृहामध्ये ५ वी घटना आहे जेवणामध्ये हानिकारक पदार्थ आढळल्याची आम्ही या संदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा विद्यापीठामार्फत या मेस व उपहारगृह चालकावरती कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही FDA तक्रार केली होती त्या प्रमाणे FDA चे अधिकारी तपासणीसाठी आले होते त्यांना अनेक गैरप्रकार आढळले शेवटी आम्हाला आता FDA वरती विश्वास आहे आशा मेस चालवतो कारवाई करेल त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण जेवण मिळेल.
प्रतिक्षा वाघमारे
उपाध्यक्ष – विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समिती SPPU युनिट
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला United Breweriesचा मोठा हातभार! ₹4200 कोटींचा कर महसूल आणि स्थानिक
आतापर्यंत या मेस मध्ये घडलेले गैरप्रकार त्या वरती आमही. केलेल्या तक्रारी त्या वरून काहीच न झालेल्या सुधारणा
आम्ही गैरप्रकारांचे मुलींच्या आरोग्य वरती कसा विपरीत परिणाम होत आहे. या सर्व गोष्टी FDA अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आम्हाला आशा आहे मेस चालकावरती कारवाई होईल
तनिष्का भंडारी (उपस्थित विद्यार्थिनी SPPU).
मागील १ वर्षापासून विद्यापीठातील मेस मध्ये ५० ते १० असे किडे, आल्या, मच्छर, झुरळ अशा गोष्टी जेवणामध्ये आढळल्याचे प्रकार घडले आहेत, त्यानंतर निवेदन, आंदोलन, मोर्चे, होतात. पुन्हा या घटना सातत्याने होतात. विद्यापीअरमारोहत कारवाई केली जात नाही. oxford Of The East म्हटल्या जाणाऱ्या विद्यापीठाने या विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन कायमचा जेवण संदर्भात सुधारणा कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या जेवणाबाबत यापूर्वीही विद्यार्थिनींनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. एफडीएच्या या धाडीमुळे कॅन्टीन कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.
CJP Janatar-Mantar 2.0: चलो दिल्ली…! १० ऑक्टोबरपासून दिल्लीत जंतर मंतर सिझन 2 ; सौरव दास
अहवालानंतर पुढील कारवाई: प्रयोगशाळेकडून अन्नाच्या सॅम्पल्सचा तपासणी अहवाल आल्यानंतर कंत्राटदारावर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार (FSSAI) पुढील कठोर कारवाई किंवा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया केली जाईल.
इतर कॅन्टीनवर नजर: विद्यापीठ परिसरातील इतर वसतिगृहे आणि विभागांमधील कॅन्टीनचीही लवकरच विशेष पथकाद्वारे तपासणी केली जाणार असल्याचे संकेत एफडीए प्रशासनाने दिले आहेत.
“वसतिगृहातील विद्यार्थिनींना स्वच्छ, ताजे आणि गुणवत्तेचे अन्न मिळणे हा त्यांचा हक्क आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणतीही गय न करता कडक कारवाई केली जाईल.”
— अन्न व औषध प्रशासन (FDA), पुणे






