राज्यातील तापमानात होतेय घसरण; पुण्यात नोंदवले यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान
पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहराच्या किमान तापमानात सातत्याने घट होत असून, शनिवारी (ता.२१) पारा थेट ११.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले आहे. त्यामुळे पहाटे घराबाहेर पडणाऱ्यांना थंडीचा सामना करावा लागत असून, पुढील दोन दिवसही गारठा कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे.
शहरात गेल्या आठवड्यापासून थंडीचा प्रभाव वाढत आहे. विशेषतः मध्यरात्रीनंतर तापमानात घट होत असल्याने पहाटेच्या वेळी गारवा अधिक जाणवत आहे. दरम्यान, दिवसभर उन्हाची तीव्रता तुलनेने कमी असल्याने दुपारचे वातावरण मात्र आल्हाददायक राहत आहे. शनिवारी शहरात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसभर आकाश निरभ्र आणि वातावरण कोरडे होते. शहराच्या विविध भागांतही तापमानात फरक जाणवत असून, हवेली, पाषाण, एनडीए आणि सिंहगड रस्ता परिसरात थंडीचा प्रभाव अधिक आहे.
दरम्यान, मगरपट्टा आणि चिंचवड परिसरात तुलनेने अधिक तापमानाची नोंद झाली. रविवारी (ता. २२) किमान तापमानात किंचित वाढ होऊन ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची, तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
थंडीचा प्रभाव वाढतोय
शहरात गेल्या आठवड्यापासून थंडीचा प्रभाव वाढत आहे. विशेषतः मध्यरात्रीनंतर तापमानात वेगाने घट होत असल्याने पहाटेच्या सुमारास थंडी अधिक जाणवू लागली आहे. सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक, मॉर्निंग वॉकला जाणारे ज्येष्ठ नागरिक आणि व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
FAQ
1. पुण्यात शनिवारी किमान तापमान किती नोंदवण्यात आले?
पुण्यात शनिवारी किमान तापमान ११.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.
2. पुण्यातील ११.२ अंश तापमानाचे विशेष महत्त्व काय आहे?
यंदाच्या हंगामातील पुण्यातील हे आतापर्यंतचे नीचांकी किमान तापमान ठरले आहे.
3. पुण्यात कमाल तापमान किती नोंदवण्यात आले?
शनिवारी पुण्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.






