चलो दिल्ली...! १० ऑक्टोबरपासून दिल्लीत जंतर मंतर सिझन 2 ; सौरव दास यांचे आवाहन
दिल्ली पोलिसांनी दिल्लीत विद्यार्थी आंदोलन दडपण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला. त्यावरून सौरव दास यांनी भाष्य केलं आहे. सौरव दास म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही सर्व लोक, सर्व विद्यार्थी संघटना आणि या देशाचा प्रत्येक नागरिक या लढाईत एकजुट होणार आहे. ही लढाई खूप सोपी नसेल.
गेल्या वेळी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याासाठी दिल्लीत आंदोलन सुरू होते. त्यावेळी पोलिसांनी कसा पद्धतीने निर्दयीपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, त्यांची माथी फोडली. तरुणींचे शोषण केले, त्यांचे विनयभंग केले. पॅलेट गन चालवली. बिहारमध्य तर भाजप सरकारने AK47चालवली गेली. यावेळीदेखील दिल्लीत हे लोक असेच काहीतरी षडयंत्र रचत आहेत. या देशातील युवा एकजुट झाला तर आपली खैर नाही, अशी या सरकारल भीती वाटत आहे. यावेळची लढाई खूप दूर चालणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून लोकांनी यावं. दिल्ली चलो चा नारा आधीच संपूर्ण देशात फिरत आहे.
ज्या लोकांनी आपली तिकीटे केली नाही. त्यांनी आपापली तिकीटे काढून घ्यावीत. दिल्लीत तुम्हाला खूप दिवस थांबावे लागणार आहे. ही लढाई खूप दिवस चालणार आहे. ही एका दिवसाची लढाई नाही. या सरकारचा जी भूमिक आहे. त्यावरून असे दिसते की, आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. पण आपण नक्कीच विजयी होऊ, गेल्या वेळी आम्ही इतके मोठे आंदोलन केले. ३५-३६ दिवस आम्ही जंतरमंतरवर राहिलो, आम्ही लाठ्या खाल्ल्या, देशातील विस्कटलेली यंत्रणा आणि या भ्रष्ट यंत्रणांना पुन्हा ठिक करायचे असेल तर या लढाई लढावीच लागणार आहे आणि ते मतदानाच्या हक्कातून होणार आहे, हे देशातील तरुणांना कळले आहे.
तुमचा मतदानाचा हक्कच हिरावून घेतला गेला तर तुमचा नागरिक म्हणून अस्तित्वच काय राहिले. एक नागरिक म्हणून तुम्ही तुमच्या मताचे रक्षण करणे हा तुमचा अधिकार आहे. पण ज्ञानेश कुमार यांच्यासारखे गद्दार, जे खरे देशद्रोही आहेत, असे लोक मोठमोठ्या संस्थांच्या प्रमुख पदांवर राहिले तर या देशाचा विकास कधीही होऊ शकत नाही. या लोकांनी आपल्या मताची चोरी केली आहे. या लोकांना यंत्रणेतून हटवलेच पाहिजे. ही जबाबदारी आता देशातील युवांवर आली आहे. हे फक्त देशातील युवा करू शकतात हे सरकारला माहित असल्यामुळे सरकारही घाबरले आहे.
सरकारने २०२४ पासून झेन-झी ला मतदान याद्यांमध्ये अॅड केलेले नाही. असे का झाले, कारण या देशातील हवा बदलू लागली आहे. जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणात देशातील वातावरण बदलू लागले आहे. युवा तरुणांनी, झेन-जी ची मते आपल्याला मिळणार नाहीत, हे माहिती असल्यानेच त्यांनी झेन-जीची नावे नोंदवली नाहीत, असा आरोप सौरव दास यांनी केला.
अशा लोकांना योग्य उत्तर मिळावे, यासाठी आम्ही येत्या १० ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्ली चलोचा नारा दिला आहे.या आंदोलनात देशाचा प्रत्येक नागरिक जोडला जाणार आहे. रस्त्यांवर येईल आणि तेव्हाच घरी जाईल, ज्यावेळी आपल्या मागण्या मान्य होतील. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा झाला तरी आपण मागे हटणार नाहीत, याचे कारण म्हणजे जोपर्यंत निवडणूक प्रक्रिया बदलली जात नाही, ती साफ होत नाही. तोपर्यंत मागे हटणार नाही. निवडणूक आयुक्त निवड प्रक्रियेत बदल होत नाही. तोपर्यंत हे आंदोनल सुरू राहिल. इतकेच नव्हे तर, ज्ञानेश कुमार यांच्यावर जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे, त्यांना तात्काळ अटक करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच एसआयआर प्रक्रिया तात्काळ गोठवण्यात यावी आणि जानेवारी 2025 ची मतदार यादी होती तीच पुन्हा तात्काळ प्रभावाने लागू करण्यात यावी. एसआयआर प्रक्रियेदरम्यान जे निर्णय घेतले गेले, त्याची चौकशी करण्यात यावी. बेकायदेशीर निर्णय रद्द करण्यात यावेत, अशा काही मागण्याही सीजेपी कडून करण्यात आल्या आहेत.






