Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झाडांच्या मुळाशी करवतीचे घाव! कर्जतच्या ‘या’ गावात नेमकं काय घडतंय? पर्यावरणप्रेमी का संतापले?

झाडे नष्ट करण्यासाठी आग लावण्यात आल्याची अनेक घटना घडल्या आहेत.त्यात आता 100 ते 200 वयोमान असलेली जुनी झाडे तोडण्याचे काम सुरू झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 20, 2026 | 02:35 AM
झाडांच्या मुळाशी करवतीचे घाव! कर्जतच्या ‘या’ गावात नेमकं काय घडतंय? पर्यावरणप्रेमी का संतापले?
Follow Us
Follow Us:
  • कर्जत तालुक्यात झाडे तोडण्यास पर्यावरण प्रेमींचा आक्षेप
  • पाली साई डोंगर मध्ये 200 वर्षे जुनी झाडे तोडण्यास सुरुवात
  • झाडांच्या मुळाशी करवतीचे घाव
कर्जत: कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामस्थांचा विरोध असताना देखील पाली साई डोंगर येथे टोरंट कंपनी कडून येथील जमिनीवर अतिक्रमण कायम ठेवले आहे. वन विभागाने आपली जमीन धरणे बांधण्यास देण्याचा निर्णय घेतला असल्याने त्या जमिनी वर असलेली 200 वर्षे जुनी झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे.दरम्यान जंगलातील झाडे तोडण्यास स्थानिक पर्यावरणप्रेमी यांनी विरोध केला असून तेथील जंगलात लावलेल्या आगी बद्दल देखील संताप व्यक्त केला आहे.झाडे काही दिवसांनी पडतील अशी व्यवस्था करण्यात येत असून झाडांच्या मुळाशी करवतीचे घाव घातले जात आहेत.

अनेक ठिकाणी रद्द करण्यात आलेला टोरंट जलविद्युत प्रकल्प कर्जत तालुक्याच्या मानगुटीवर बसवण्यात आला आहे.या प्रकल्पाला सर्वबाजूंनी विरोध केला जात असून स्थानिक पाली तर्फे कोतवाल खलाटी ही ग्रामपंचायत पूर्णपणे धरणाच्या विरोधात आहे.मात्र तरीदेखील शासनाच्या हस्तक्षेप आणि शासनाचा छुपा पाठिंबा यामुळे टोरंट कंपनील बळ मिळाले आहे.कंपनीला वन विभागाने 640 एकर जमीन दिली असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे.त्यानंतर त्या जमिनी मधील जुनी झाडे नष्ट करण्याचे कारस्थान टोरंट कंपनी कडून सुरू आहे.

झाडे नष्ट करण्यासाठी आग लावण्यात आल्याची अनेक घटना घडल्या आहेत.त्यात आता 100 ते 200 वयोमान असलेली जुनी झाडे तोडण्याचे काम सुरू झाले आहे. ही झाडे स्थानिकांच्या डोळ्यासमोर तोडली जात असून वन विभागाच्या क्षेत्रातील ही झाडे तोडली जात असताना वन विभागाचा एकही कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन आक्षेप घेत नसल्याने स्थानिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.स्थानिकांनी दळी जमिनीमधील झाडे तोडली तरी आवाज उठवणारे वन विभाग आता आहे कुठे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मात्र वन जमिनीमध्ये असलेली जुनी झाडे तोडण्यास स्थानिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी पप्पू देशमुख यांनी विरोध केला आहे. देशमुख हे दिवसभर जंगलात फिरून जंगलात कुठेही झाडे तोडली जात असल्यास तेथे पोहचतात आणि आक्षेप घेतात.स्थानिक आदिवासी लोक हे देशमुख यांच्या सोबत जंगलात जाऊन हा आक्षेप नोंदवत असल्याने टोरंट कंपनीचे झाडे तोडण्याचे पितळ उघडे पडले आहे.देशमुख यांच्याकडून जंगलात जाऊन घेण्यात येत असलेल्या आक्षेप यामुळे पावसाआधी जंगल समूळ नष्ट करण्याचे टोरंट कंपनीचे प्रयत्न काही प्रमाणात फोल ठरत आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रेमी पप्पू देशमुख हे टोरंट कंपनी साठी जंगल तोडीपासून वाचवण्यात अडथळा ठरले आहेत.त्यामुळे यावर्षी काही दिवसावर आलेल्या पावसाळा लक्षात घेता हजारो झाडे नष्ट होण्यापासून वाचली आहेत.

करवतीचे घाव कशासाठी..
टोरंट कंपनीकडून जंगल साफ करण्यासाठी अनेक झाडांना करवतीचे घाव घातले जात आहे.बहुसंख्य झाडांच्या मुळाशी असे घाव घातल्याचे चित्र साई डोंगर मध्ये पाहायला मिळत आहे.

Web Title: Felling of 200 year old trees begins at pali sai hill for the torrent project karjat enviornment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • environment
  • Karjat
  • tree cutting

संबंधित बातम्या

Sindhudurga: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ गावे संवेदनशील जाहीर; पाच तालुक्यांचा पश्चिम घाट…
1

Sindhudurga: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ गावे संवेदनशील जाहीर; पाच तालुक्यांचा पश्चिम घाट…

Kolhapur Ganpati: कोल्हापुरातील ‘भू-अधिपती’ गणपती ठरतोय आकर्षण; मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश
2

Kolhapur Ganpati: कोल्हापुरातील ‘भू-अधिपती’ गणपती ठरतोय आकर्षण; मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप
3

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.