anjali damania
मुंबई- शिवसेनेतून शिंदे गटाने बंड करत भाजपासोबत सरकार स्थापन केले. आता या घटनेला ९ ते १० महिने होताहेत, एकिकडे धनुष्यबाण व शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे. पण ठाकरे गटाने १६ आमदार अपात्रेची याचिका सुप्रीम कर्टात दाखल केली आहे. यावर मागील अनेक महिन्यापासून सुनावणी सुरु आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पाच घटनापीठाकडे आहे. याची सुनावणी न्यायलायात सुरु आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना, आता सामाजिक कार्यकर्त्या आणि माजी आपच्या कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक मोठं व खळबळजन वक्तव्य केलं आहे. त्यांनी एक ट्विट करत, धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच
बघू…..
आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 11, 2023
दमानियांनी काय म्हटलंय ट्विटमध्ये?
दरम्यान, सत्तासंघर्षाची सुनावणी या महिन्यात होणार आहे. या निकालाची उत्सुकता लागली असताना, दमानियांच्या ट्विटमुळं अनेक तर्कवितर्क केले जाताहेत. “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच बघू….. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची…” असं ट्विटमध्ये दमानियांनी म्हटलं आहे. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं असून, आगामी काळात सरकार जाणार का, यावर बोललं जात आहे.
अजित पवार भाजप बरोबर जाणार?
अजित पवार हे मागील आठवड्यात नॉट रिचेबल होते. त्यामुळं ते नाराज आहेत, तसेच सत्तासंघर्षाचा निकाल सरकारचा विरोधात जाणार आहे. त्यामुळं शिंदे गटातील पंधरा आमदार अपात्र ठरणार असून, अजित पवार हे भाजपासोबत जाणार असल्याचं अंजली दमानियांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांचा बी प्लन तयार असून, त्यांनी भाजपाच्या बाजूनी किंबा सॉफ्ट वक्तव्य भाजपासाठी अनुकूल वक्तव्यं केली आहेत, त्यामुळं आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत जाणार का? यावर राजकीय वर्तुळाच चर्चां सुरु आहे.