रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असून, उद्या (शुक्रवारी) रायगडावर मोठय़ा दिमाखात शिवराज्याभिषेक दिन सोहळा (Shiv Rajyabhishek) साजरा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असून, यानिमित्त राज्य शासनामार्फत शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता उद्घाटन समारंभ होणार असून, या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (chief minister) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (deputy chief minister) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण करण्यात येईल. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे. तसेच हा भव्य दिव्य शिवराज्याभिषेक होणार आहे, त्यामुळं या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गर्दीचा उच्चांक ठरणार…
दरम्यान, उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळं आणि अनेक प्रशासकीय अधिकारी यांचा मुक्काम किल्ले रायगडावर आहे. उद्या (शुक्रवारी) रायगडावर मोठय़ा दिमाखात शिवराज्याभिषेक दिन सोहळा (Shiv Rajyabhishek) साजरा होणार आहे. यामुळं येथे येणाऱ्या गर्दीचे नियोजन कसे करायचे यावर संयोजकांसमोर प्रश्न आहे, कारण उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे होणार आहेत, त्यामुळं देशातून राज्यातून शिवप्रेमी येणार आहेत, त्यामुळं गर्दीचा उच्चांक ठरेल, असं संयोजकांकडून सांगण्यात येतंय. या सोहळय़ाला शिवभक्तांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने ३३ समित्या नियुक्त केल्या आहेत. शिवराज्याभिषेक सोहळय़ासाठी प्रशासन सज्ज असून, अत्यावश्यक सेवा, सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
चार अग्निशमन वाहने
आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. पार्किंग, बस डेपो, गड पायथा, गडावरील सर्व मंडप, भोजन कक्ष अशा सर्व आवश्यक ठिकाणी एकूण चार अग्निशमन वाहने सज्ज ठेवण्यात येणार आहे. तसेच वाहनतळाची जागा, गड पायथा आणि पायरीमार्गावर प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर आहे.
एसटीच्या 150 बसगाडय़ा
राज्यभरातून रायगड किल्ल्याकडे येणाऱ्या शिवभक्तांसाठी सोयीच्या ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. वाहने या ठिकाणी ठेवल्यानंतर शिवभक्तांची ने-आण करण्यासाठी वाहनतळ ते पाचाड नाका या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत १५० बसगाडय़ा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. एसटी वाहन चालक, पोलीस, वैद्यकीय पथकांसाठीही मंडप उभारण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी राज सदर, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर आदी ठिकाणी आराम कक्ष आणि नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.
शिवभक्तांसाठी आरोग्य व्यवस्था…
गडावर आरोग्य अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक, पुरेसा औषधसाठा यासह एकूण २४ वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून १०४ डॉक्टर्स व ३५० आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र सज्ज ठेवण्यात आले आहेत. शिवभक्तांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने अत्याधुनिक जीवरक्षक प्रणाली सुविधा असणार आहे. चार तर अन्य सुविधा असणाऱ्या १६ रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत.
सोहळय़ावर ड्रोन, सीसीटीव्हीची करडी नजर
सोहळय़ाला होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा, वॉकी टॉकी, पोर्टेबल साऊंड, सर्च लाईट, वीज अटकाव यंत्रणा आदी साधन-सामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण सोहळय़ावर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.