आजरा : निंगुडगे (ता.आजरा) येथे पैशाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीमध्ये शिवराज मगदूम यांना आप्पाजी मगदूम (रा. तेरणी ता. गडहिंग्लज) व अन्य दोघांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी आप्पाजी मगदूम व अन्य दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवराज मगदूम यांच्या मालकीची गाय आप्पा मगदूम यांनी खरेदी केली होती. या व्यवहारातील शिल्लक पैसे शिवराज यांनी मागितल्याचा राग आप्पा यांना आला. याच रागातून त्याने त्यांच्या डोक्यात वार करून जखमी केले.
याबाबत शिवराज मगदूम यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आप्पाजी मगदूम व अन्य दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.