Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाव तेथे नवी एसटी धावणार! ५ वर्षात २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता, प्रताप सरनाईक यांची माहिती

एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या 5 हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, असा निर्णय आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 27, 2025 | 02:34 PM
५ वर्षात २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता (फोटो सौजन्य-X)

५ वर्षात २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

एसटी महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी ५००० या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत.अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मोठी बातमी! दिल्लीपाठोपाठ मुंबईतील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी

२०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलवली होती. यामध्ये एसटीच्या सद्यस्थितीची परिस्थिती मंत्री सरनाईक यांनी विशद केली. सध्या एसटी महामंडळाकडे केवळ १४ हजार ३०० बसेस असून त्यापैकी १० वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या १० हजार बसेस आहेत. त्या पुढील ३-४ वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः च्या बसेस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आम्ही आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी असा प्रस्ताव मांडला. अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाची निकड लक्षात घेऊन तातडीने तत्वतः मान्यता दिली असून त्याबद्दल त्यांचे मंत्री सरनाईक यांनी आभार मानले आहेत.

तसेच दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे सन २०२९ साली या २५ हजार बसेस व ५ हजार इलेक्ट्रिक बसेस याप्रमाणे ३० हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल भविष्यात ” गाव तिथे एसटी… मागेल त्याला बस फेरी..!” आपणं देऊ शकतो. “आज आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन एसटी वर प्रेम करणाऱ्या लाखो सर्वसामान्य जनतेला गोड भेट दिली आहे. याबध्दल मी त्यांचा शतशः आभार आहे.”,अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटी महामंडळ दरवर्षी पाच हजार नवीन बस घेणार आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षांत महामंडळाकडे २५ हजार बस असतील. यापुढे भाडेतत्त्वावर बस घेतल्या जाणार नाहीत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. दरम्यान महामंडळाला सध्या प्रतिदिन तीन कोटी रुपयांचा तोटा होत आहे. अशा परिस्थितीत दरवाढ करणे गरजेचे होते. दरवर्षी ठरावीक दरवाढ केली पाहिजे; मात्र गेली तीन वर्षांत केली गेली नाही, मात्र आता दरवाढ करावी लागली.

ठाण्यात घरगुती वादातून एकाची आत्महत्या; सातव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

Web Title: Finance minister ajit pawar approves acquisition of 25000 self owned lalpari buses in 5 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
1

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता बससेवा होणार अधिक जबाबदार, मिळणार तात्काळ मदत
2

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता बससेवा होणार अधिक जबाबदार, मिळणार तात्काळ मदत

Mumbai Metro: डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
3

Mumbai Metro: डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

Pune MSRTC: पुणे एसटी विभागाला ऑक्टोबर महिन्यात 23 लाखांचे उत्पन्न; ‘ही’ कारणे ठरली फायदेशीर
4

Pune MSRTC: पुणे एसटी विभागाला ऑक्टोबर महिन्यात 23 लाखांचे उत्पन्न; ‘ही’ कारणे ठरली फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.