शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक शाळांना, रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळत आहे. त्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिल्लीतील अनेक शाळांना काही कालावधीपूर्वी बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आता अशीच घटना मुंबईत घडली आहे. मुंबईत देखील एका शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.
मुंबईतील कांदीवली येथील इराणीवाडी येथील आंतरराष्ट्रीय शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाली आहे. या शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेलद्वारे प्राप्त झाली आहे. या शाळेला ईमेल प्राप्त होताच शाळेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर बॉम्ब नाशक पथक, आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बॉम्बने शाळेला उडवण्याची धमकी प्राप्त होताच पोलिसांनी शाळेची तपासणी सुरू केली आहे. संपूर्ण शाळा रिकामी करण्यात आली आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी जोगेश्वरी येथील शाळेला देखील अशाच प्रकारे बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाली होती. मात्र तपास केळ्यावत ती धमकी खोटी असल्याची माहिती मिळाली. सध्या मुंबईतील शाळांना अशा प्रकारच्या धमक्या मिळत असल्याने मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.
Maharashtra | KES College in Kandivali West received a bomb threat e-mail today. A Police team has reached the college and is investigating the matter. The e-mail was sent to the college's official e-mail ID: Mumbai Police
— ANI (@ANI) January 27, 2025
दिल्लीतील शाळांना देखील मिळतेय धमकी
दिल्लीमध्ये गेल्यावर्षी 30 हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशमन विभाग आणि बस पथकाने तासनतास तपास केला. कुठेही काही संशयास्पद आढळले नाही. तपासाअंती पोलिसांनी हा फेक कॉल असल्याचे घोषित केले. सध्या पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. धमकीचा ई-मेल कुठून आणि कोणी पाठवला याचा तपास पोलीस करत आहेत.
यापूर्वी अलीकडेच सुमारे 40 शाळांना धमकीचे ई-मेल आले होते. मे महिन्यात 200 हून अधिक शाळा आणि इतर आस्थापनांना ई-मेलद्वारे धमक्या देऊन बॉम्बस्फोटही करण्यात आले होते. या सर्व प्रकरणात दिल्ली पोलिसांचे हात अजूनही रिकामे आहेत. शाळांमध्ये बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारा ई-मेल पाठवणे दिल्ली पोलिसांसाठी आव्हान बनले आहे.
हेही वाचा: Bomb Threat : धमक्यांचं सत्र सुरूच…! आता RBI बँकेला बॉम्बनं उडवण्याची धमकी, रशियन भाषेत आला ई-मेल
RBI बँकेला देखील मिळालेली धमकी
देशातील धमकीचे कॉल्स आणि ई-मेल्सचा ओघ थांबायचं नाव घेत नाही. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा मेल आला होता. या मेलमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. RBI गव्हर्नरच्या मेल आयडीवर रशियन भाषेतील ई-मेल आला. मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून त्यांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ईमेल रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर आला आहे. धमकीचे ईमेल रशियन भाषेत असल्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या होत्या.