Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; परिवहनमंत्र्यांचा सज्जड दम

सध्या एसटी महामंडळाला दररोज सरासरी 10 लाख 87 हजार लिटर डिझेलची गरज भासते. हे डिझेल प्रामुख्याने इंडियन ऑईल कॉर्पोशन लिमिटेड आणि भारत प्रेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांकडून खरेदी केले जाते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 25, 2026 | 06:30 PM
डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; परिवहनमंत्र्यांचा सज्जड दम

डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; परिवहनमंत्र्यांचा सज्जड दम

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) डिझेल खरेदीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. काही कंपन्यांकडून माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री सरनाईक म्हणाले की, सध्या एसटी महामंडळाला दररोज सरासरी 10 लाख 87 हजार लिटर डिझेलची गरज भासते. हे डिझेल प्रामुख्याने इंडियन ऑईल कॉर्पोशन लिमिटेड आणि भारत प्रेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांकडून खरेदी केले जाते.

घाऊक ग्राहक म्हणून एसटीला या कंपन्याकडून प्रति लिटर 2 रुपये 70 पैसे सवलत देते. मात्र, संबंधित कंपनीची बैठक घेऊन या सवलती मध्ये 30 पैसे वाढवून घेतले. त्यामुळे महामंडळाचे वर्षाकाठी 10 ते 12 कोटीची बचत होऊ लागली. तथापि, 3 रुपयांची सवलत मिळत असली, तरी इतर राज्य परिवहन महामंडळांना यापेक्षा अधिक सवलत मिळत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाला याच कंपन्यांनी 4 रुपये पेक्षा जास्त सवलत देऊ केली आहे. एवढेच नाही तर आंध्र प्रदेश परिवहन महामंडळाला तब्बल 5 रुपये 50 पैसे सवलत मिळत आहे.

Mumbai Metro 12A ची घोषणा, डोंबिवली ते नवी मुंबई आता मेट्रोने जा! कसा असेल मार्ग?

इतर राज्यांनी राबवलेली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया हे यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगून त्याच धर्तीवर एसटीनेही डिझेल खरेदीसाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ मिळवण्यासाठी यापैकी एक कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने देखील निविदा प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. अशा प्रकारे वेळकाढूपणा करणे, माध्यमातून चुकीच्या बातम्या पेरून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचे केविलवाणे प्रयत्न संबंधित कंपन्यांनी थांबवले पाहिजेत, असे परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले. तसेच डिझेल खरेदीच्या निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमबद्धता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या एसटी महामंडळावर सुमारे 12 हजार कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. वर्षाकाठी डिझेल खरेदीवर सुमारे 3,400 कोटी रुपये खर्च होतात. लवकरच 8 हजार नव्या डिझेल बसेस ताफ्यात दाखल होणार असल्याने हा खर्च अंदाजे 4,700 कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डिझेल दरात केवळ 1 रुपयांची घट झाली, तरी वर्षाकाठी सुमारे 50 ते 55 कोटी रुपयांची बचत होऊ शकते आणि हा महामंडळासाठी मोठा आर्थिक दिलासा ठरू शकतो. एसटीची आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता अबाधित ठेवणे ही शासनाची प्राथमिकता आहे. निविदा प्रक्रिया नियमांनुसार आणि निष्पक्षपणे राबवली जाईल, आणि एसटीच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

Mumbai Fruit Seller: नागरिकांनो फळ खाताय, मग हा Video बघाच…! परप्रांतीय फळविक्रेत्यांकडून फळांना विषारी पदार्थ लावून विक्री

Web Title: Msrtc transport minister pratap sarnaik gave a stern warning to those who were cheating in the purchase of diesel for st

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी
1

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा
2

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा
3

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
4

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.