Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मीरा-भाईंदरमध्ये आगीचे तांडव; 4-5 इमारती आगीच्या विळख्यात; परिवहन मंत्री घटनास्थळी दाखल

मीरा-भाईंदर शहरात आगीच्या तांडवात अनेक कुटुंब होरपळून गेली. या दुर्घटनेत चार ते पाच इमाराती आगीच्या विळख्यात सापडल्या. याबाबत परिवहन मंत्र्यांनी घटनास्थळी दाखल होत पालिकेला सुचना केल्या आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 26, 2026 | 12:49 PM
मीरा-भाईंदरमध्ये आगीचे तांडव; 4-5 इमारती आगीच्या विळख्यात; परिवहन मंत्री घटनास्थळी दाखल
Follow Us
Follow Us:

 

  • 4-5 इमारती आगीच्या विळख्यात
  • परिवहन मंत्री घटनास्थळी दाखल
भाईंदर/विजय काते : मीरा-भाईंदर शहरात आगीच्या तांडवात अनेर कुटुंब होरपळून गेली. प्लेझंट पार्क परिसरात आगीने रौद्ररुप धारण केलं त्यामुळे या दुर्घटनेत चार ते पाच इमाराती आगीच्या विळख्यात सापडल्या. या भीषण आगीने मोठे नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेत पिडित झालेल्या कुटुंबीयांची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांचे घरगुती साहित्य, मालमत्ता आणि उपजीविकेचे साधन जळून खाक झाले आहे. पीडितांच्या व्यथा ऐकल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी तातडीने मदत आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. “पीडितांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळाली पाहिजे, तसेच त्यांचे पुनर्वसनही तातडीने करण्यात यावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सरनाईकांनी आगीच्या वेळी अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर न पोहोचल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली. या संदर्भात संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. “अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येतो, त्यामुळे कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.दरम्यान, मंत्री सरनाईक यांनी महानगरपालिका अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेत तातडीच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या. आगीसारख्या आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम आणि तत्पर करण्यावर त्यांनी भर दिला.या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने यापुढे अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

मुंबई स्वच्छतेकडे मोठं पाऊल! कचऱ्याची विल्हेवाट आता स्मार्ट गाड्यांनी; ९८८ नव्या वाहनांची एंट्री

आगीचं नेमकं कारण काय ?

प्लेझंट पार्कमधील लागलेल्या या आगीमुळे अनेकांच्या जीवावर बेतलं. याचं कारण अद्याप असपष्ट आहे. मात्र प्राथमिक तपासानुसार असं सांगितलं जातं की, मुख्य कारण गॅस सिलिंडरचा स्फोट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. एकामागून एक सिलेंडर स्फोट इतक्या तीव्रतेने झाला की, काही कळायच्या आतच आग वेगाने पसरली आणि इमारतींच्या काही घरांनाही तिचा मोठा फटका बसला. या आगीत परिसरात उभ्या असलेल्या दोन ते तीन टेम्पोंचे गंभीर नुकसान झाले असून ते पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. अग्नीशमन दल वेळेत दाखल झाल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं. त्यामुळे इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलं. यात मालमत्तेचं नुकसान झालं असलं तरी सुदैवानी कोणतीही जिवितहानी झाली नाही. वेळीच खबरदारी घेत परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आणि त्यामुळे अनर्थ टळला असं सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात वसुलीला वेग; ओझर्डेत थकीत नळ कनेक्शन तोडणीची धडक मोहीम

 

Web Title: Fire breaks out in mira bhayander 4 5 buildings gutted in fire pratap sarnaik reaches the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • Fire Incident
  • mira bhayandar
  • Pratap Sarnaiik

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: फिटनेस संपलेली MBMC बस रस्त्यावर? भाईंदर पोलीस स्टेशनसमोर चाक निकामी; मोठी दुर्घटना टळली
1

Mira Bhayandar News: फिटनेस संपलेली MBMC बस रस्त्यावर? भाईंदर पोलीस स्टेशनसमोर चाक निकामी; मोठी दुर्घटना टळली

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक प्रकार! धावत्या अ‍ॅक्टिवामधून अचानक बाहेर आला साप, चालकाची उडाली तारांबळ
2

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक प्रकार! धावत्या अ‍ॅक्टिवामधून अचानक बाहेर आला साप, चालकाची उडाली तारांबळ

Mira Jagannath : जिंकलस गं पोरी! ‘स्वप्न महाग नसतात, जिद्द अपुरी असते’ अभिनेत्रीचं नवं घर अन् नव्या घराची वास्तुशांती!
3

Mira Jagannath : जिंकलस गं पोरी! ‘स्वप्न महाग नसतात, जिद्द अपुरी असते’ अभिनेत्रीचं नवं घर अन् नव्या घराची वास्तुशांती!

Mira Bhayandar News : महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; आदिवासी जमीन प्रकरणामुळे मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात खळबळ
4

Mira Bhayandar News : महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; आदिवासी जमीन प्रकरणामुळे मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.