Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim Ginning Fire: जिनिंगमध्ये आगीचा तांडव! १० हजार क्विंटल कापूस खाक; अग्निशमन जवानांची अथक झुंज

Washim Karanja Ginning Fire 10000 Quintals Cotton Burnt: कारंजा तालुक्यातील मेहा फाट्याजवळील लक्ष्मी झिंटेक्स जिनिंगमध्ये भीषण आग लागून तब्बल १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 13, 2026 | 09:08 PM
Washim Karanja Ginning Fire

Washim Karanja Ginning Fire

Follow Us
Follow Us:
  • कारंज्यात जिनिंगला भीषण आग
  • अग्निशमन वाहनात बिघाड तरी जवानांची झुंज
  • १० हजार क्विंटल कापूस जळून खाक
वाशिम: कारंजा तालुक्यातील धनज रोडवरील मेहा फाट्‌याजवळ असलेल्या लक्ष्मी झिंटेक्स प्रायव्हेट लिमिटेड जिनिंगमध्ये बुधवारी दुपारच्या सुमारास कापसाच्या गंजींना भीषण आग लागली. या आगीत तब्बल १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची माहिती आहे. आगीचे रौद्ररूप पाहता जिनिंगमधील मोठ्या प्रमाणातील कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती निर्माण झाली होती. अशा गंभीर परिस्थितीत कारंजा अग्निशमन दलाच्या जवानांनी तांत्रिक अडचणीवर मात करीत अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले. (Washim Ginning Fire)

Mumbai News : भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध! भाई जगतापांची निविदा रद्द करण्याची मागणी

या घटनेची माहिती धनज बुद्रुक येथील सर्वधर्मीय सामाजिक कार्यकर्ते श्याम सवाई यांनी कारंजा अग्निशमन दलाचे फायरमन शुभम झोपाटे यांना दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र, धनज रोडवर जात असताना अग्निशमन वाहनाच्या जॉइंटचे नट-बोल्ट तुटल्याने वाहनात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. ऐन आपत्तीच्या वेळी उद्भवलेल्या या अडचणीमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या मोहिमेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती.

मात्र, जवानांनी परिस्थितीपुढे हार न मानता तातडीने कारंजा येथून लहान अग्निशमन वाहन आणि मेकॅनिकला घटनास्थळी बोलावून घेतले, वाहनाची आवश्यक दुरुस्ती करून अग्निशमन मोहिमेला पुन्हा सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.

दुहेरी आव्हानातही जवानांची कर्तव्यनिष्ठा

या अग्निशमन मोहिमेत अग्निशमन अधिकारी विवेक माकोडे, वाहनचालक भारत जोंधळे, चंदू खराडे, जाहिद अली, फायरमन इमरान खान, राहुल गुल्हाने आणि संजय धुवारे यांनी सहभाग घेतला. एकीकडे जिनिंगमधील कापसाला लागलेली भीषण आग, तर दुसरीकडे अग्निशमन वाहनातील तांत्रिक बिघाड, अशा दुहेरी संकटाचा सामना करीत जवानांनी दाखविलेली जिद्द आणि सेवाभाव उल्लेखनीय ठरला. आपत्तीच्या काळात स्वतःच्या अडचणीवर मात करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी धावून जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Devendra Fadnavis: मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलणार नाहीत! फडणवीसांचा टर्मिनल-१ साठी नवा प्लॅन, प्रस्तावाचा उद्देश काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: वाशिम जिल्ह्यात जिनिंगला आग कुठे लागली?

    Ans: कारंजा तालुक्यातील मेहा फाट्याजवळ असलेल्या लक्ष्मी झिंटेक्स प्रायव्हेट लिमिटेड जिनिंगमध्ये कापसाच्या गंजींना भीषण आग लागली.

  • Que: जिनिंगमधील आगीत किती कापूस जळून खाक झाला?

    Ans: या भीषण आगीत तब्बल १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची माहिती आहे.

  • Que: जिनिंगला आग कधी लागली?

    Ans: बुधवारी दुपारच्या सुमारास जिनिंगमधील कापसाच्या गंजींना आग लागली.

Web Title: Washim karanja ginning fire 10000 quintals cotton burnt pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • Crop Loss
  • Fire Incident
  • Karanja City
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana: कपाशी उत्पादक शेतकऱ्यांवर संकट! दोन वेच्यांतच पीक संपलं, खर्च वसूल करणंही कठीण
1

Buldhana: कपाशी उत्पादक शेतकऱ्यांवर संकट! दोन वेच्यांतच पीक संपलं, खर्च वसूल करणंही कठीण

वाशिममधील पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकरांचे आवाहन
2

वाशिममधील पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकरांचे आवाहन

Solapur News : दिवाळीच्या रॉकेटने घडवला अनर्थ! सात रस्ता बस डेपोत आगीचा भडका, तीन बसेस जळून खाक
3

Solapur News : दिवाळीच्या रॉकेटने घडवला अनर्थ! सात रस्ता बस डेपोत आगीचा भडका, तीन बसेस जळून खाक

Washim news: वाशिम पोलिसांची धडाकेबाज कारवाई! एकाच आरोपीकडून ५ चोरीच्या दुचाकी जप्त, आरोपी ताब्यात
4

Washim news: वाशिम पोलिसांची धडाकेबाज कारवाई! एकाच आरोपीकडून ५ चोरीच्या दुचाकी जप्त, आरोपी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.