malad fire
मुंबई: मुंबईत (Mumbai Fire) आज आगीची दुसरी घटना घडली आहे. ओशिवरातील आगीनंतर मालाडमधील (Malad Fire) आप्पापाडा येथील झोपड्यांना भीषण आग लागली आहे. अग्नीशमन दलाकडून ही लेव्हल 3 ची आग असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या आगीत अद्याप जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र झोपड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (Malad Appa pada Fire News)
#WATCH | Mumbai: Level 2 fire breaks out in the shanties of a slum in Malad’s Anand Nagar area. No injuries have been reported. pic.twitter.com/rsH6a9JJ6P
— ANI (@ANI) March 13, 2023
साधारणपणे संध्याकाळी 4.52 वाजता मालाड (पूर्व) भागात आग लागली. याविषयी माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. अनेक टँकरदेखील आणण्यात आले आहेत. ताडपत्री, प्लास्टीक, लाकडी वस्तू आणि पेपर स्क्रॅपमुळे ही आग वेगाने पसरत गेल्याची माहिती देण्यात आली आहे. ही झोपडपट्टी डोंगरानजीक पसरलेली असल्याने अग्निशमन दलाला आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.
दाटीवाटीचा परिसर असल्याने आग पसरण्याची भीती
ही आग लागल्यानंतर तात्काळ या परिसरात असलेल्या इतर घरातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम स्थानिक नागरिक आणि अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सुरु करण्यात आले आहे. तसेच हा परिसर हा अत्यंत दाटीवाटीचा असल्याने या भागात आग अधिक पसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सकाळी ओशिवरामध्ये आग
आज सकाळी ओशिवरातील फर्निचर मार्केटमध्ये आग लागली होती. या आगीत 30-40 दुकाने जळून खाक झाली. मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. ओशिवरातील आग लागलेल्या भागात 200 पेक्षा जास्त दुकाने आहेत. ही लेव्हल 3 म्हणजेच अतिशय गंभीर स्वरुपाची आग असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुंबईत वांवार आगीच्या घटना घटत आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी आग विझवण्यासाठी जाणं छोट्या रस्त्यांमुळे अवघड जात आहे. यावर लवकर तोडगा काढण्याची गरज आहे.