Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elephant: ‘ओंकार’ हत्तीवर सुतळी बॉम्बने हल्ल्याचे प्रकरण; पोलिसांनी दिले ‘हे’ मोठे स्पष्टीकरण

बांदा-वाफोली परिसरात फिरणाऱ्या 'ओंकार' हत्तीला एका व्यक्तीने लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओतील ती व्यक्ती पोलिस कर्मचारी असल्याचा अनेकांचा गैरसमज झाला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 13, 2025 | 02:43 PM
Elephant: ‘ओंकार’ हत्तीवर सुतळी बॉम्बने हल्ल्याचे प्रकरण; पोलिसांनी दिले ‘हे’ मोठे स्पष्टीकरण
Follow Us
Close
Follow Us:

ओंकार हत्तीचा तळकोकणात मुक्तसंचार 
ओंकार हत्तीवर  सुतळी बाॅम्बने हल्ला करण्याची घटना
ओंकारला लाकडी दांड्याने मारहाण 

सावंतवाडी: अनेक धक्कादायक गोष्टी सोशल मिडियावर व्हायरल होत असतानाच इथे आणखीन एका संतापजनक घटनेची नोंद झाली आहे. घटना सिंधुदुर्गमधील बांदा येथून समोर येत असून इथे ओंकार हत्तीवर  सुतळी बाॅम्बने हल्ला करण्याची घटना घडून आली आहे. “ओंकार हत्ती” हे एकरानटी हत्ती आहे जो सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर फिरताना दिसून येत आहे. दरम्यान ओंकार हत्तीला मारहाण झाल्याचे देखील समोर आले होते. यावर आता पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

बांदा-वाफोली परिसरात ओंकार नावाच्या हत्तीला लाकडी दांड्याने मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती पोलीस कर्मचारी नव्हती, असा स्पष्ट दावा बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी केला आहे. या व्यक्तीचा शोध घेऊन तिच्यावर योग्य गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी आता सावंतवाडी वनविभागाची असल्याचे पत्र बांदा पोलिसांनी वनविभागाला पाठवले आहे.

बांदा-वाफोली परिसरात फिरणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला एका व्यक्तीने लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओतील ती व्यक्ती पोलिस कर्मचारी असल्याचा अनेकांचा गैरसमज झाला होता. पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, मारहाण करणारा तो इसम पोलिस दलातील नसल्याचे समोर आले आहे. पालवे यांच्या म्हणण्यानुसार, आमचा पोलिस कर्मचारी कायम गणवेशावर असतो. संबंधित व्यक्ती नेमकी कोण, हे आम्हाला कळू शकले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

माणुसकीचा अंत! नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीच्या अंगावर टाकला सुतळी बॉम्ब, हादरवणारी दृश्ये अन् Video Viral

नक्की काय घडलं?

माहितीनुसार, असं सांगण्यात आलं आहे की, ओंकार हत्ती नदीच्या पाण्यात आंघोळीचा आनंद लुटत होता आणि याचवेळी विरुद्ध दिशेने त्याच्या अंगावर काही सुतळी बॉम्बचा मारा करण्यात आला. या फटाक्यांचा आवाज आणि स्फोट पाहताच हत्ती घाबरला. व्हिडिओमध्ये हत्ती सुतळी बाॅम्बचा हल्ला होताच भेदरुन जंगलात जाताना दिसून येतो. ही घटना बांदा येथे घडून आली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून आता यूजर्सद्वारे घटनेवर संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीच्या अंगावर सुतळी बॉम्ब फेकले, सिंधुदुर्गात चीड आणणारा प्रकार,… व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. तसेच संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.#OmkarElephant #videoviral pic.twitter.com/nx6ceY2bys — Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 8, 2025

मुक्या जनावरांसोबत अशी क्रुर घटना घडणे काही नवीन राहिलं नाही. याआधीही माणसांनी प्राण्यांच्या जीवावर हल्ला करुन त्यांच्या जीवाशी खेळू पाहिलं आहे ज्यामुळे यूजर्स आता संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आहेत. माणसांची माणूसकी संपत आहे आणि क्रुरता किती वाढत चालली आहे याची प्रचिती आपल्याला या व्हिडिओतून घेता येते.

Web Title: Firecracker on omkar elephant in banda sindhudurga police give explanation viral news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • elephant
  • Elephant Video
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

तळकोकणात ‘ओंकार’ पाठोपाठ ‘राजा’चा तूफान धुमाकूळ; उपद्रव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत
1

तळकोकणात ‘ओंकार’ पाठोपाठ ‘राजा’चा तूफान धुमाकूळ; उपद्रव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!
2

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांचे आमरण उपोषण सुरु
3

Sindhudurg : सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांचे आमरण उपोषण सुरु

Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप
4

Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.