nana patole in congress meeting
नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची बैठक (Maharashtra Pradesh Congress Meeting) नुकतीच नागपूरमध्ये (Nagpur) संपन्न झाली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी हा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावासह एकूण ५ ठराव या बैठकीत सादर करुन मंजूर करण्यात आले. या सगळ्या ठरावांविषयी आपण माहिती जाणून घेऊयात. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole)यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी प्रदेश काँग्रेसचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते.
1.राहुल गांधींचा अभिनंदनाचा ठराव
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नुकतीच संपन्न झाली. कन्याकुमारीहून सुरु झालेली ही यात्रा नांदेड, जळगाव इत्यादी ठिकाणीही आली होती. नांदेड आणि शेगावमध्ये जनसभा झाली. भारत जोडो यात्रा महाराष्ट्र राज्यात यशस्वीरित्या संपन्न झाल्याबद्दल राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीट्वारे संमत करण्यात आला. तसेच राज्यातील जनतेने या यात्रेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल जनतेचेही आभार मानण्यात आला.
2.भारत जोडो यात्रा यशस्वी करणाऱ्यांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अभिनंदनाचा ठराव
भारत जोडो यात्रा यशस्वी केल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानणारा ठराव बैठकीत मांडण्यात आला. या दुसऱ्या ठरावात काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते.माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष, सहप्रभारी, आजी – माजी खासदार- आमदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, आघाडी संघटना विभाग आणि सेलचे प्रमुख यांच्यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरील पक्षाचे सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
[read_also content=”एका डम्परच्या धडकेने नवी मुंबईकरांच्या तोंडचे पळाले पाणी, हेटवणेजवळ पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया https://www.navarashtra.com/maharashtra/water-pipeline-bursts-near-chirner-which-came-from-hetawane-dam-nrsr-360752.html”]
3.केंद्र व राज्य शासनाच्या निषेधाचा ठराव
बैठकीतल्या एका ठरावात सांगण्यात आले की, केंद्रातील मोदी सरकार सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे राबवत आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारची सगळी धोरणे शेतकरी विरोधी आहेत. सरकारमुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. धान व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी केंद्र सरकारकडून सातत्याने सुरूच आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रति क्विंटल ७०० रुपयाचे बोनस देण्यात आले होते, त्यामध्ये या इडी सरकारने मोठ्या प्रमाणात बदल करून प्रति क्विंटल बोनस देण्या ऐवजी हेक्टरी मदत जाहीर करून फक्त ३७५ रुपये इतकाच बोनस शेतकऱ्यांना मिळत असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांसोबतची ही धोकादडी आहे. तसेच केंद्र शासनाची पीकविमा योजना देखील सरकारी लुटीचा केंद्र बनला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या निषेधाचा ठराव काँग्रेसकडून मांडण्यात आला.
4.सरसकट कर्जमाफीचा ठराव
या वर्षीच्या अतिवृष्टी व सातत्याच्या पावसामुळे शेतीपिकाचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण पीककर्ज राज्य शासनाने सरसकट माफ करावे हा ठराव मांडण्यात आला.
5. सुरजगड लोहप्रकल्प सुरु करण्याचा ठराव
गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे उच्च प्रतीच्या लोहखनिजाचा साठा असून हा साठा शेकडो वर्षे पुरेल इतका आहे. देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी लोहखनिजाची ही खाण आहे. या ठिकाणी भिलाई सारखा लोहप्रकल्प निर्माण झाल्यास महाराष्ट्रातील जवळपास एक ते दीड लाख तरुणांना रोजगार मिळेल, राज्याचा औद्योगिक विकास भरभराटीचे होईल आणि स्थानिक पातळीवर छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायाला चालना मिळेल. मात्र केंद्र व राज्यसरकार हा प्रकल्प या ठिकाणी जाणीव पूर्वक सुरूकरण्यास टाळाटाळ करत असून येथील लोहखनिज परराज्यात लुटून आपल्या उद्योगपती मित्रांच्या घश्यात घालत आहे. यामुळे औद्योगिक विकासासोबतच राज्याचा महसूलही मोठ्या प्रमाणात बुडत आहे. महाराष्ट्र आणि विदर्भाच्या विकासाकरिता अत्यंत महत्वाचा असणारा सुरजगड लोहप्रकल्प तात्काळ सुरु करून विकासाला चालना द्यावी असा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मांडला आहे.