Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Agricultural News: शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार: माणिकराव कोकाटेंची घोषणा

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, आवश्यकता भासल्यास पुरवणी मागण्यांमध्ये वाढीव निधीची तरतूद करण्यात येईल.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 25, 2025 | 12:36 PM
Agricultural News: शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार:  माणिकराव कोकाटेंची घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, गेल्या सहा महिन्यात ५० ते ५५ धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षात २५ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री केलेल्या ॲड.माणिकराव कोकाटे यांनी केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी आमदार अभिजीत पाटील, स्मार्टचे प्रकल्प संचालक हेमंत वसेकर, संचालक रफिक नायकवडी, संचालक आत्मा अशोक किरन्नळी, प्रक्रिया व नियोजन संचालक विनयकुमार आवटे, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने तसेच कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

By Poll Elections: विधानसभा निवडणुकांची घोषणा; चार राज्यांत १९ जूनला होणार मतदान

कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, भांडवली गुंतवणूकीमध्ये कांदा चाळ, साठवणगृहे, नवीन तंत्रज्ञान यासारख्या शेतकऱ्यांच्या गरजांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत धोरण जाहीर करण्यात आले असून, त्याचा सविस्तर धोरणात्मक शासन निर्णय येत्या आठवड्याभरात काढण्यात येईल. कृषी क्षेत्रातील भविष्यातील धोरण ठरविण्यासाठी शेतकऱ्यांच्या विचारांचा, कल्पनांचा समावेश आवश्यक आहे. त्यादृष्टीने विभागस्तरावर अशा कार्यशाळा, परिसंवाद घेण्यात येत असून, त्या अंतर्गत पुणे विभागीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

ते म्हणाले, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, आवश्यकता भासल्यास पुरवणी मागण्यांमध्ये वाढीव निधीची तरतूद करण्यात येईल. कृषी विभागाने योजनांची प्रचार, प्रसिद्धी करावी. शासनाच्या सुविधा, योजना शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी तसेच शेताच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेण्यात येतील. शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले असून योजनांच्या लाभाची रक्कम धनादेशाद्वारे न देता डीबीटीद्वारे खात्यात जमा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती करावी, असे आवाहन यावेळी ॲड. कोकाटे यांनी केले.

NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे दिल्लीत एकत्र येणार; नेमकं काय आहे कारण?

या परिसंवादात विविध पीक उत्पादक २० कंपन्या व शेतकरी यांच्यासोबत सुमारे ५ तास गटचर्चा करण्यात आली. यामध्ये गुणवत्तेनुसार कांद्याला हमीभाव, मागेल त्याला कांदा चाळ, आंतरमशागतीसाठी अत्याधुनिक कृषी अवजारे, ऊस पिकासाठी सुधारित तंत्रज्ञान, नवीन वाण, केळी उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयोग, प्रक्रिया उद्योगांसाठी चालना, ज्वारी वरील प्रक्रिया उद्योग, डाळिंब, द्राक्षे आदींसाठी सुविधा, मका पिकाला हमीभाव, उत्पादित माल साठवणुकीसाठी गोडाऊन, सेंद्रिय उत्पादनाचे प्रमाणीकरण, देशी गाई पाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान, अंजीर फळाचा फळपिक विमा योजनेमध्ये समावेश, अंजीर सुकवण्यासाठी संशोधन केंद्रास वाढीव निधी, आंब्यासाठी हमीभाव, भाजीपाला उत्पादकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे, संरक्षित शेती, सेंद्रिय उत्पादित मालासाठी स्वतंत्र बाजारपेठ, तूर आयात निर्यात धोरणामध्ये सुस्पष्टता आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या परिसंवादात पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Five thousand crore rupees will be provided every year for capital investment in agriculture manikrao kokates announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 12:36 PM

Topics:  

  • Agricultural News
  • Manikrao Kokate

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;
1

Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे
2

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; ‘या’ पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद
3

महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; ‘या’ पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद

बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखचा राज्य सरकारकडून सन्मान; ३ कोटी रुपये रोख बक्षीस देऊन केला गौरव
4

बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखचा राज्य सरकारकडून सन्मान; ३ कोटी रुपये रोख बक्षीस देऊन केला गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.