Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Millet research: बाजरी संशोधनाला मोठे यश; राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाद्वारे विकसित बाजरीचे वाण

मराठवाडा विभागातील कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त व अधिक उत्पादनक्षम बाजरीच्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असून त्यातून उत्पादन व उत्पन्न वाढीस मोठा लाभ होणार आहे, या वाणांमुळे उत्पादनक्षमता वाढून शेतकऱ्याचे आर्थिक सक्षमीकर

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 02, 2026 | 05:39 PM
Millet research:  बाजरी संशोधनाला मोठे यश; राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाद्वारे विकसित बाजरीचे वाण
Follow Us
Close
Follow Us:
  • बाजरीच्या (जैवसंपृक्त) दोन संकरीत वाणांना भारत सरकारच्या वनस्पती वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क नोंदणी प्राधिकरणाकडून अधिकृत नोंदणी
  • हा वाण २०१७ साली प्रसारित करण्यात आला असून खरीप हंगामासाठी विशेष शिफारस
  • हा वाण गोसावी व करपा रोगास प्रतिकारक असल्यामुळे रोगांपासून होणारे नुकसान कमी होते
Parbhani News: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाद्वारे विकसित केलेल्या बाजरीच्या (जैवसंपृक्त) दोन संकरीत वाणांना भारत सरकारच्या वनस्पती वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क नोंदणी प्राधिकरणाकडून अधिकृत नोंदणी मिळाली आहे.

विद्यापीठाने विकसित केलेल्या AHB 1200Fe (MH 2072) व AHB 1269Fe (MH 2185) या बाजरो (Pennisetum glaucum (L.) R.Br.) वाणांना विद्यमान (अधिसूचित) वनस्पती वाण (Extant -Notified Plant Variety) म्हणून नोंदणी प्रदान करण्यात आली आहे. ही नोंदणी ४ डिसेंबर २०२५ रोजी देण्यात आली असून नोंदणी क्रमांक अनुक्रमे REG/2025/0236 व REG/2025/0237 असे आहेत. या जातींसाठी विद्यापीठ हे खरे पैदासकार आणि संवर्धक असल्याचे मान्य करण्यात आले.

BJP Leader Viral Video: ‘इथे २०–२५ हजारांत मुली मिळतात’; भाजपमंत्र्याच्या पतीचा व्हिडिओ व्हायरल

‘उत्पादन, विक्रीचे प्राप्त झाले विशेष अधिकार’

विद्यापीठास या वाणाच्या उत्पादन, विक्री, वितरण, आयात व निर्यातीचे विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत. प्रारंभी सहा वर्षांसाठी ही नोंदणी वैध असून त्यानंतर नूतनीकरणाची तरतूद आहे. ही नोंदणी विद्यापीठासाठी अत्यंत गौरवास्पद असून संशोधन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे. यासाठी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांचे मार्गदर्शन लाभले.

याशिवाय या प्रक्रियेत नोडल अधिकारी डॉ. व्ही. एन. चिचणे यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ही नोंदणी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या सातत्यपूर्ण संशोधन कार्याची पावती असून विकसित झालेल्या या संकरित जाती शाश्वत शेतीस चालना देणाऱ्या ठरणार आहेत. त्यामुळे मराठवाडा विभागातील कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त व अधिक उत्पादनक्षम बाजरीच्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असून त्यातून उत्पादन व उत्पन्न वाढीस मोठा लाभ होणार आहे, या वाणांमुळे उत्पादनक्षमता वाढून शेतकऱ्याचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल. त्यामुळे ही नोंदणी शेतकरी, संशोधक व विद्यापीठ यांच्यासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. पवार, आयआयएमआरचे संचालक डॉ. सी. तारा सत्यवती, डॉ. एन. वाय, सातपुते, डॉ. एम. गोविंद राज, डॉ. ए. बी. बागडे, डॉ. डी. के. पाटील, डॉ. आर. सी. सावंत यांनी संशोधन कार्य केले आहे.

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

एएचबी-१२०० वाण

हा वाण २०१७ साली प्रसारित करण्यात आला असून खरीप हंगामासाठी विशेष शिफारस करण्यात आली आहे. या वाणाचा पिकाचा कालावधी केवळ ८० ते ८५ दिवस इत्तका असून अल्प कालावधीत भरघोस उत्पादन देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे. हेक्टरी धान्य उत्पादन २५ ते ३० क्विंटल तर कडबा उत्पादन ५५ ते ६० क्विंटल इतके मिळते. या वाणाची कणसे घट, दाणे टपोरे असून त्यांचा रंग हिरवट आहे. तसेच फुटव्याचे प्रमाण जास्त असल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ होते. १००० दाण्यांचे वजन १५ ते १८ ग्रॅम इतके असून धान्य दर्जेदार मिळते, या वाणामध्ये लोहाचे सरासरी प्रमाण ८८ मि.ग्रॅ. कि.ग्रॅ. तर जस्ताचे प्रमाण ४३ मि.ग्रॅ. कि.ग्रॅ. इतके असून पोषणमूल्याच्या दृष्टीने हा वाण अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या वागाची संपूर्ण देशात प्रसारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे हा वाण गोसावी व करपा रोगास प्रतिकारक असल्यामुळे रोगांपासून होणारे नुकसान कमी होते. त्यामुळे शेतक-यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यानी हे वाण शेतात पेरून उत्पादन वाढवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

बाजरीचे संकरीत वाण ‘एचबीबी-१२६९’

हा वाण सन २०१८ मध्ये प्रसारित करण्यात आला असून खरीप हंगामासाठी विशेषतः शिफारस करण्यात आली आहे. हा वाण ८० ते ८२ दिवसांत तयार होतो. याची धान्य उत्पादकता प्रतिहेक्टरी ३० ते ३२ क्विंटल तर कडबा उत्पादन ७२ ते ७५ क्विंटल इतके मिळते. या वाणाचे कणीस घट्ट व टपोरे असून दाण्यांचा रंग हिरवट आहे. फुटव्याचे प्रमाण अधिक असल्याने उत्पादनात वाढ होते. १००० दाण्यांचे वजन १५ ते १८ ग्रॅम इतके आहे. या वाणामध्ये पोषणमूल्येही अधिक असून लोहाचे प्रमाण सरासरी ९१ मि.ग्रॅ./ कि.ग्रॅ. व जस्ताचे प्रमाण ४५ मि.ग्रॅ./ कि.ग्रॅ. इतके आहे. त्यामुळे हा वाण पोषणदृष्ट्या समृद्ध मानला जात आहे. या गुणवत्तेमुळे संपूर्ण देशात प्रसार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच हा वाण गोसावी व करपा रोगास प्रतिकारक असल्यामुळे उत्पादनात स्थिरता मिळते व शेतकन्यांचा खर्च कमी होतो. त्यामुळे मराठवाड्यासह इतर कोरडवाहू भागातील शेतक-यांसाठी हा बाजरी वाण फायदेशीर ठरणार आहे.

 

Web Title: Parbhani two biofortified pearl millet varieties developed by vnmkv get central government registration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • Agricultural News
  • Farmers News
  • Parbhani News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : अखेर परभणीतही भाजपा-सेना युती तुटली; भाजपने युती तोडल्याचा जोरदार आरोप
1

Maharashtra Politics : अखेर परभणीतही भाजपा-सेना युती तुटली; भाजपने युती तोडल्याचा जोरदार आरोप

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince
2

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन
3

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.