
PCMC Election 2026, Pimpri-Chinchwad Municipal Corporation,
प्रभाग क्रमांक २५ मधून भाजपचे संपूर्ण पॅनल निवडून देण्याचे आवाहन करताना राहुल कलाटे यांनी सहकारी उमेदवार कुणाल वाव्हळकर, रेश्मा चेतन भुजबळ, श्रुती राम वाकडकर यांना मतदानरूपी आशीर्वाद देऊन सेवेची संधी देण्याची विनंती नागरिकांना केली. महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित पिंपरी-चिंचवड शहर घडवण्याचा निर्धार व्यक्त करत भाजपच्यावतीने प्रचाराची सांगता करण्यात आली. (Municipal Election 2026)
“ही निवडणूक गल्लीबोळात ‘दादा’ तयार…”; पुण्यनगरीतून CM फडणवीसांचा पवारांवर निशाणा?
राज्यातील विकासाच्या दिशेबाबत बोलताना राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वामुळे विकसित महाराष्ट्रासोबतच विकसित पिंपरी-चिंचवड शहर उभारले जाईल. स्पष्ट धोरणे आणि लोकाभिमुख निर्णयांमुळे शहराचा विकास अधिक वेगाने साध्य होईल,” असे त्यांनी नमूद केले.
तसेच प्रभाग क्रमांक २५ साठी पुढील काळातील व्हिजन मांडताना त्यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित केलेला विकास अजेंडा सादर केला. टँकरमुक्त पाणीपुरवठा, ट्रॅफिकमुक्त रस्ते, प्रदूषणमुक्त वातावरण, सक्षम आरोग्य सुविधा, शिक्षण, क्रीडा व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे ही या प्रभागाच्या विकासाची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे राहुल कलाटे यांनी सांगितले.
राहुल कलाटे म्हणाले, “मी दिलेला शब्द पाळतो आणि जे बोलतो तेच करून दाखवतो. लोकांच्या विश्वासावरच माझी राजकीय आणि सामाजिक जीवनातील वाटचाल सुरु आहे. केवळ आश्वासने नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून बदल घडवणे हाच माझा अजेंडा आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २५ मधील नागरिकांच्या समोर विकासाचे ७ सूत्र मांडत आहे.”
IND vs NZ 2nd ODI Playing 11 : आयुष बदोनी पदार्पण करणार, अर्शदीप सिंग पुन्हा आऊट? कसा असेल
प्रभाग २५ साठी विकासाची ७ सूत्र! :
१. टँकरमुक्त प्रभाग – नियमित व पुरेसा पाणीपुरवठा
२. ट्रॅफिकमुक्त व्यवस्था – रस्ते, कनेक्टिव्हिटी, मेट्रो व पार्किंगचे नियोजन, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
३. प्रदूषणमुक्त परिसर – हरित व धूळ, प्रदूषण नियंत्रण उपक्रम
४. आरोग्य सुविधा संपन्न प्रभाग – दवाखाने व वैद्यकीय सेवा, परवडणाऱ्या आरोग्य सुविधांमध्ये वाढ करणे
५. शिक्षण– क्रीडा – रोजगार सुविधा संपन्न प्रभाग – सर्व वयोगटातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी
६. कुटुंब कल्याण आणि संस्कृती रक्षण – महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिकांना सुलभता होईल असे उपक्रम आणि सांस्कृतिक पुनर्जागरण
७. सुरक्षित प्रभाग – प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध
कुणाल वाव्हळकर
“राहुल कलाटे यांच्या जनसंपर्काचा प्रचारादरम्यान भरपूर लाभ झाला. प्रभाग २५ मधील नागरिकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. विकास, पारदर्शकता आणि लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही एकजुटीने काम करणार आहोत. प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजयाचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे.”
रेश्मा चेतन भुजबळ
“प्रभागातील वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरात राहणाऱ्या प्रत्येक महिलांचे प्रश्न, पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षितता या विषयांवर आम्ही ठोस भूमिका मांडली आहे. प्रचारादरम्यान मिळालेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद हेच सांगतो की नागरिकांना विकास हवा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रभागाचा सर्वसमावेशक विकास हाच आमचा खरा अजेंडा आहे.”
धक्कादायक ! जावयाने गळा दाबून केली सासऱ्याची हत्या; मृतदेह लपवण्यासाठी थेट पुलाखालीच…
श्रुती राम वाकडकर
“प्रभाग क्रमांक २५ मधील महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक घटकाच्या प्रश्नांना न्याय देणे ही आमच्या सर्वांची प्राथमिकता आहे. केवळ आश्वासनांवर नाही, तर प्रत्यक्ष कामातून विश्वास निर्माण करणे हेच भाजपाचे ध्येय आहे. राहुलदादा कलाटे यांचा अनुभव आणि प्रभागातील नागरिकांकडून मिळणारा पाठिंबा पाहता, प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी नागरिक आम्हाला नक्की आशीर्वाद देतील, याबाबत खात्री आहे.”