पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गेल्या निवडणुकीत ३२ प्रभाग होते. तेव्हा सदस्य संख्या १२८ होती. आता ४६ प्रभाग असून सदस्य संख्या १३९ इतकी आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपचे ७७ नगरसेवक निवडून आले होते. अपक्षचे ५ नगरसेवकही भाजपबरोबरच होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७ नगरसेवक निवडून आल्याने ते दुसऱ्या क्रमांकावर होते. तर शिवसेनेचे ९ नगरसेवक निवडून आल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या निवडणुकीत महापौर आणि उपमहापौर पद दोन्ही भाजपकडे होत.






