Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Visarjan 2026: थायलंडच्या पर्यटकांनी केली बाप्पाची आरती; गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्याने परदेशी पाहुणे भारावले

Ganesh Visarjan 2026: अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील गिरगाव चौपाटीवर झालेल्या गणेश विसर्जन सोहळ्यात 23 देशांतील आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि पाहुण्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या विशेष दालनातून त्यांनी विसर्जन मिरवणूक अनुभवली. थायलंडमधील पर्यटकांनी गणपतीची आरती केली...

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 26, 2026 | 05:50 PM
थायलंडच्या पर्यटकांनी केली बाप्पाची आरती; गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्याने परदेशी पाहुणे भारावले

थायलंडच्या पर्यटकांनी केली बाप्पाची आरती; गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्याने परदेशी पाहुणे भारावले

Follow Us
Follow Us:
  • गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध
  • गिरगाव चौपाटीवर अनुभवली महाराष्ट्राच्या संस्कृतीची जादू
  • 23 देशांतील पर्यटकांचा ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष
Ganesh Visarjan 2026: अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील ऐतिहासिक गिरगाव चौपाटीवर झालेल्या भव्य गणेश विसर्जन सोहळ्याने यंदा परदेशी पर्यटकांनाही महाराष्ट्राच्या संस्कृतीची अनोखी अनुभूती दिली. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने परदेशी पर्यटकांसाठी विशेष दालन उभारले होते. या दालनातून आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी गणेश विसर्जन मिरवणूक जवळून अनुभवली.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे जगभरातील 23 देशांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि पाहुण्यांचा सहभाग. थायलंडमधून आलेल्या पर्यटकांनी केवळ मिरवणूक पाहिली नाही, तर गणपती बाप्पाच्या आरतीतही उत्साहाने सहभाग घेतला. पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, गणेशभक्तांची गर्दी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषामुळे परदेशी पाहुणे भारावून गेले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यटन विभागाने केलेल्या आयोजनाचे कौतुक केले. गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळत असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी परदेशी पर्यटकांचा सहभाग आणि विसर्जन सोहळ्याच्या शिस्तबद्ध आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

Lalbaugcha Raja Visarjan: ढोल-ताशांचा गजर अन् भक्तांचा सागर; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

पर्यटन विभागाच्या विशेष दालनात उपस्थित अधिकाऱ्यांनी परदेशी पाहुण्यांसोबत गणपतीची आरती केली. या वेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांच्यासह पर्यटन विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र पर्यटनाच्या युवा दूत नवेली देशमुख उपस्थित होत्या.

इटलीच्या मार्कोंना आनंदाश्रू

इटलीहून आलेल्या मार्को यांनी हा सोहळा प्रथमच अनुभवल्याचे सांगितले. श्रद्धा, एकता आणि आनंदाचा संगम या उत्सवात पाहायला मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लाखो भाविक एकाच स्वरात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत असल्याचे दृश्य आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचेही त्यांनी सांगितले.

फिनलँडहून आलेल्या जॉना सुनी यांनीही विसर्जन सोहळ्याचा अनुभव अनोखा आणि भावस्पर्शी असल्याचे सांगितले. ढोल-ताशांचा नाद, पारंपरिक वेशभूषा, भक्तिमय वातावरण आणि भाविकांचा उत्साह यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीची भव्यता अनुभवायला मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. महाराष्ट्रातील लोकांचे प्रेम, आपुलकी आणि पाहुणचार विशेष भावल्याचेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राच्या पर्यटनाला जागतिक व्यासपीठ

पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. परदेशी पर्यटकांना उत्सवात सहभागी करून घेणे हा महाराष्ट्राच्या परंपरांचा जागतिक स्तरावर प्रसार करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा उपक्रमांमुळे राज्यातील सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांच्या म्हणण्यानुसार, विशेष दालनामुळे परदेशी पर्यटकांना विसर्जन मिरवणूक जवळून पाहण्याबरोबरच गणेशोत्सवाच्या भावनेशी जोडण्याची संधी मिळाली. अनेक पर्यटकांनी गणरायाच्या आकर्षक मूर्तींसोबत छायाचित्रे काढत हे क्षण कॅमेऱ्यात कैद केले. गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन यामुळे परदेशी पाहुण्यांसाठी केवळ पर्यटनाचा अनुभव न राहता महाराष्ट्राची श्रद्धा, परंपरा, उत्सवप्रियता आणि आतिथ्यशील संस्कृती अनुभवण्याची संधी ठरली.

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप

Web Title: Foreign tourists experience maharashtra culture at ganesh visarjan girgaon chowpatty mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026

संबंधित बातम्या

तुडुंब, तुडुंब नुसती गच्च भरली! गणेशोत्सवात Pune Metro मालामाल; 12 दिवसांत तब्बल 7 कोटी…
1

तुडुंब, तुडुंब नुसती गच्च भरली! गणेशोत्सवात Pune Metro मालामाल; 12 दिवसांत तब्बल 7 कोटी…

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक
2

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक

Mumbai News: ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन
3

Mumbai News: ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन

Lalbaugcha Raja Visarjan: ढोल-ताशांचा गजर अन् भक्तांचा सागर; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप
4

Lalbaugcha Raja Visarjan: ढोल-ताशांचा गजर अन् भक्तांचा सागर; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.