Lalbaugcha Raja Visarjan: ढोल-ताशांचा गजर अन् भक्तांचा सागर; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप
Lalbaugcha Raja 2026: मुंबईकरांच्या लाडक्या लालगबागचा राजाचा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आपल्या लालबागच्या राजाला निरोप दिला आहे. यावेळी सर्वजण भावूक झाले होते. भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाल निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी केली होती.
आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले होते. आज सकाळी 10 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास हा विसर्जन सोहळा पार पडला. यावेळी अनंत अंबानी देखील लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर उपस्थित होते. (फोटो सौजन्य – युट्यूब)
शुक्रवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास उत्तरपूजेनंतर लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी मंडपाबाहेर जमली होती. यावेळी मंडपाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. त्यानंतर ढोल – ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात विसर्जन सोहळा सुरु झाला.
राजाला निरोप देण्यासाठी आणि बाप्पाच्या अंतिम दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काल दुपारच्या सुमारास सुरु झालेला हा विसर्जन सोहळा आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संपन्न झाला. यावेळी भाविकांनी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी केली होती.
Mumbai Metro 3: अनंत चतुर्दशीला मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा; Aqua Line ची सेवा रात्रभर राहणार सुरू
नियमानुसार, लालगबागच्या राजाच्या विसर्जनापूर्वी मूर्तीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे अमूल्य दागिने टप्प्याटप्प्याने आणि सुरक्षेच्या कारणास्तव काढण्यात आले. यानंतर विसर्जनाचा अंतिम टप्पा सुरू झाला. यावेळी कुलाबा आणि कफ परेड परिसरातील कोळी बांधव देखील गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लालबागच्या राजाचा विजय असो, गणपणी बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषणाने संपूर्ण चौपाटी परिसर दुमदुमून गेला.






