Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Naik: “…अशा ठिकाणी मेंढपाळांना अडवू नये”; वनमंत्री गणेश नाईकांचे निर्देश

मेंढपाळांना वनांमध्ये चराईसाठी परवानगी देण्यासंदर्भात विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी  गणेश नाईक यांनी वरील सूचना केल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 04, 2025 | 07:58 PM
Ganesh Naik: “…अशा ठिकाणी मेंढपाळांना अडवू नये”; वनमंत्री गणेश नाईकांचे निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: वनांमध्ये विशिष्ट वयापर्यंत वाढलेल्या झाडांच्या परिसरात मेढ्यांना चरण्यासाठी परवानगी देण्यात आली असून अशा ठिकाणी मेंढपाळांना अडवू नये, असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. तसेच अशा प्रकरणी कोणत्याही मेंढपाळांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मेंढपाळांना वनांमध्ये चराईसाठी परवानगी देण्यासंदर्भात विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी  गणेश नाईक यांनी वरील सूचना केल्या. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आदी यावेळी उपस्थित होते.

वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, पावसाळ्याच्या चार महिन्यात वन क्षेत्रात लहान झाडे असलेल्या ठिकाणी मेंढ्यांना चारण्यास बंदी आहे. मात्र, मेंढपाळांची मागणी लक्षात घेऊन नियमांनुसार विशिष्ट वयाची वाढलेली झाडे असलेल्या क्षेत्रात मेंढ्या चारण्यासाठी परवानगी देण्यात आली असून यासंबंधीच्या सूचना सर्व वन अधिकाऱ्यांना देण्यात येतील. तसेच वन क्षेत्रात मेंढ्या चराईप्रकरणी कोणाविरूद्धही चुकीच्या पद्धतीने कारवाई होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात येतील. पावसाळ्याच्या कालावधीत शेळ्या मेंढ्यांना चराईसाठी फिरावे लागू नये, यासाठी शासकीय जागा, गायरान जमिनी तसेच जमिनी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, वनक्षेत्राच्या बफर क्षेत्रात वन्यजीवांचा शेतीला होणारा त्रास कमी करण्यासाठी बफर क्षेत्रातील शेतजमिनी भाडेतत्वावर घेऊन तेथे सोलर प्रकल्प उभारण्याचा शासन विचार करत आहे. यामुळे सौर ऊर्जा निर्मितीबरोबरच शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळणार आहे. तसेच वन विभागाने वनक्षेत्रात गवत कुरण तयार करण्यावर भर द्यावा. माजी आमदार बच्चू कडू यांनी वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिक नुकसानाची भरपाई दुप्पट करावी. तसेच ती वेळेत द्यावी, अशी मागणी केली.

गणेश नाईक यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

महायुतीमधील अंतर्गत राजकारणाबाबत सातत्याने चर्चा होत असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय मागे घेतल्याबाबतची बातमी कधी समोर येते, तर कधी एकनाथ शिंदे यांना ठाण्यातच घेरण्यासाठी भाजपकडून मंत्री गणेश नाईक यांना ताकद दिली जात असल्याची चर्चा होते.

Ganesh Naik : ‘ठाण्यात सर्वात सिनीयर मंत्री मीच’, गणेश नाईक यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण


शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र असले तरी शिंदे आणि फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याची सातत्याने चर्चा रंगते. विशेष म्हणजे गणेश नाईक यांनी आज आपल्या भाषणात केलेल्या एका वक्तव्यावरुन पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलं आहे. “ठाण्यात सर्वात जास्त सिनीयर मंत्री मी आहे”, असं गणेश नाईक यांनी भिवंडी येथील कार्यक्रमात उघडपणे म्हटलं आहे. त्यांच्या य वक्तव्यावर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं आहे.

Web Title: Forest minister ganesh naik directed sheep allowed graze in areas trees grown to a certain age in forests

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 07:58 PM

Topics:  

  • Forest Minister
  • Ganesh Naik
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Sunil Tatkare : ‘त्यांनी आमच्यावर खालच्या लेव्हलला जाऊन टीका केली होती’
1

Sunil Tatkare : ‘त्यांनी आमच्यावर खालच्या लेव्हलला जाऊन टीका केली होती’

१ महिन्याच्या बाळावर दुर्मिळ बायलॅटरल डायफ्रामॅटिक इव्हेंट्रेशनची प्रक्रिया, गंभीर स्थितीवर कशी केली मात?
2

१ महिन्याच्या बाळावर दुर्मिळ बायलॅटरल डायफ्रामॅटिक इव्हेंट्रेशनची प्रक्रिया, गंभीर स्थितीवर कशी केली मात?

तरुणाने रेल्वे स्टेशनवरच केली महिलेची प्रसूती; डॉक्टरला व्हिडिओ कॉल केला अन् महिलेने बाळा जन्म दिला
3

तरुणाने रेल्वे स्टेशनवरच केली महिलेची प्रसूती; डॉक्टरला व्हिडिओ कॉल केला अन् महिलेने बाळा जन्म दिला

महाराष्ट्राच्या रिअल इस्टेटमध्ये नव्या युगाची सुरुवात! मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर
4

महाराष्ट्राच्या रिअल इस्टेटमध्ये नव्या युगाची सुरुवात! मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.