Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे पहाटे साडे तीन वाजता निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. मंगळवार (दि.६) दुपारी दोनपर्यंत त्यांचे पार्थिव राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 06, 2026 | 08:03 AM
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे पहाटे साडे तीन वाजता निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. मंगळवार (दि.६) दुपारी दोनपर्यंत त्यांचे पार्थिव राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सुरेश कलमाडी यांचे नाव फक्त पुण्याच्या नाहीतर देशाच्या राजकारणातही घेतले जात होते. त्यांनी राजकारणात अनेक पदे भूषवली होती. लोकसभेत पुण्याचे प्रतिनिधित्व केलेले सुरेश कलमाडी हे दिल्लीतील नेत्यांशी असलेल्या जवळीकतेमुळे अधिक परिचयाचे होते. पुण्याच्या राजकारणात आग्रहाने त्यांचे नाव घेतले जात होते.

सुरेश कलमाडी यांनी केंद्रातही मंत्रिपद भूषवले होते. पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात सुरेश कलमाडी यांनी १९९५ ते १९९६ पर्यंत रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. ते भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्षही होते. ३ ते १४ ऑक्टोबर २०१० दरम्यान दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अर्थात कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीचे अध्यक्षही होते.

1978 मध्ये प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष

सुरेश कलमाडी हे १९७८ ते १९८० दरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते १९८२ ते १९९५ आणि पुन्हा १९९८ मध्ये तीन वेळा राज्यसभेचे सदस्य राहिले. १९९६ मध्ये ११ व्या लोकसभेवर आणि २००४ मध्ये १४ व्या लोकसभेवरही ते निवडून आले. पुण्याचे माजी खासदारही होते. पी.व्ही. नरसिंह राव यांच्या भारताच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सुरेश कलमाडी यांनी १९९५ ते १९९६ पर्यंत रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.

काँग्रेसशी एकनिष्ठ अशी ओळख

सुरेश कलमाडी यांचा जन्म १ मे १९४४ रोजी झाला. ते एक भारतीय राजकारणी आणि वरिष्ठ क्रीडा प्रशासक होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे सदस्यही होते. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ अशी त्यांची ओळख होती. ते भारतीय ऑलिंपिक संघटना, आशियाई अ‍ॅथलेटिक्स संघटना आणि भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्षही राहिले होते.

हेदेखील वाचा : Pune Political News: भाजपची ‘सत्तेची मस्ती’ उतरवा! प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलला सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद

Web Title: Former pune mp suresh kalmadi has passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 07:51 AM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.