Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार भिंतीच्या पलिकडील शाळा…! दप्तराविना विद्यार्थ्यांनी घेतला धडा, नांदेडमध्ये स्त्युत्य उपक्रम

र्यावरणाशी सन्निकटता साधत आणि त्या माध्यमातून ज्ञान विज्ञानाचा अभ्यास करीत जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी वनभोजन या कार्यक्रमातून निसर्ग शाळेचा मनमुराद आनंद घेतला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 30, 2025 | 04:44 PM
Free education for students in forest outside the school Nanded News

Free education for students in forest outside the school Nanded News

Follow Us
Close
Follow Us:

नांदेड : ‘बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडे, वेली, पशू-पाखरे यांच्या गोष्टी करु’ या गदिमांच्या निसर्ग कवितेप्रमाणे विविध शालेय उपक्रमासोबतच वनभोजन या सहशालेय उपक्रमाचे शाळांकडून आयोजन केले जाते. चार भिंतीच्या आतील बंदिस्त अभ्यासक्रम एकदिवस टाळून निसर्गाच्या सानिध्यात विविध प्रकारची पिके, झाडे, पशु, पक्षी, वेली यांच्याशी गुजगोष्टी करत अनेक अनुभवांची समृद्धी हस्तगत करुन घेण्यासाठी निसर्ग शाळा हा उपक्रम घेण्यात येतो. या अंतर्गत दफ्तरविना शाळेचे आयोजन करुन विविध अध्ययन अनुभव देता येतात. पर्यावरणाशी सन्निकटता साधत आणि त्या माध्यमातून ज्ञान विज्ञानाचा अभ्यास करीत जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी वनभोजन या कार्यक्रमातून निसर्ग शाळेचा मनमुराद आनंद घेतला.

यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, संगिता बडवणे, सहशिक्षक संतोष घटकार, केंद्र समन्वयक एस. आर. गायकवाड, प्रमोद देशपांडे, उमाकांत महाजन, वसंत शिखरे, अशोक हाटकर, हरिदास पांचाळ, पांडुरंग गच्चे आदिंची उपस्थिती होती.

“जेव्हा अत्याचार होणार तेव्हा जिहाद होणार”; महमूद मदानी यांच्या विधानाने उडाला राजकीय गोंधळ

अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग

शेतीविषयक हंगाम निहाय नियोजन, भविष्यातील शेती आणि इंटरनेट शेतीची माहिती या विषयावर विषय शिक्षक उमाकांत बेबडे, संगिता बडवणे आणि मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी निरीक्षणात्मक अभ्यास केला. निसर्ग शाळेत एकूण ५५ विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला. शिक्षकांनी शेती करण्याच्या जुन्या नव्या पद्धती व अवजारे यांच्याविषयी माहिती दिली. बैठे व मैदानी खेळ, मनोरंजक खेळ घेतल्यानंतर हिरव्यागार वनराईच्या संगतीत खिचडी भजे, पापड, जिलेबी यांसह रानभाज्यांचा पुलाव व विविध प्रकारची फळे या विशेष माध्यान्ह भोजनावर ताव मारला त्यानंतर सर्व निरीक्षणे नोंदविण्यात आली.

पाचगणीत घराला भीषण आग; अनेक संसारोपयोगी वस्तू आगीत जळून खाक, 4 लाखांचे नुकसान

निरीक्षणासह रानमेव्याचा आस्वाद
सौर ऊर्जा पॅनल आणि त्याची कार्यपद्धती औषधीयुक्त वनस्पती, लघु शेती प्रकल्प, पाण्याचे विविध स्त्रोत, रब्बी हंगामातील जोंधळा, मक्का, भुईमुग, गहू, गवत, हरभरा, हळद आदी पिकांची शेते, विविध फळांची झाडे, मातीचे प्रकार, ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच कालव्याद्वारे पाणी पुरवठा, पाटाचे पाणी, गांडूळ खत प्रकल्प, रानटी झुडपे, वृक्ष-वेली, विविध पक्षी आणि त्यांचे आवाज, घरटी, विविध रानभाज्या आदी बाबींचे निरीक्षण करण्यात आले. तसेच शेंगा, बोरं, ऊसाची टिपरे, पाडाचे पेरु, मधमाशांचे पोळे या रानमेव्यांचा आस्वाद घेतला.

Web Title: Free education for students in forest outside the school nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 04:44 PM

Topics:  

  • Maharashtra school
  • Nanded
  • nanded news

संबंधित बातम्या

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला
1

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ
2

Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

Nanded News :’पैनगंगा ‘मध्ये पुनर्वन्यीकरण प्रयोग यशस्वी; नर वाघ ‘जॉनी’ला मिळाली जोडीदार
3

Nanded News :’पैनगंगा ‘मध्ये पुनर्वन्यीकरण प्रयोग यशस्वी; नर वाघ ‘जॉनी’ला मिळाली जोडीदार

Accident News : शेळगाव महाविष्णू वळण रस्त्यावर घडला भीषण अपघात; टॅकरखाली चिरडून एक जण ठार
4

Accident News : शेळगाव महाविष्णू वळण रस्त्यावर घडला भीषण अपघात; टॅकरखाली चिरडून एक जण ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.