
'Tigress brought from Pench Tiger Reserve safe in Painganga Reforestation Project
कचरू जोशी: किनवट : वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणारा महाराष्ट्रातील पहिल पुनर्वन्यीकरण (Rewilding) प्रयोग पैनगंगा वन्यजीव अभयारण्यात यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. २०१८-१० पासून अभयारण्यात वास्तव्य करणाऱ्या नऱ वाघ ‘जॉनी’ला अखेर जोडीदार मिळाला असून पेंच व्याघ्र प्रकल्पातून (Tiger Project) आणलेली वाघीण ७ जानेवारी २०२६ रोजी यशस्वीरित्या अभयारण्यात सोडण्यात आली. सध्या एक महिना उलटल्यानंतन वाघीण पूर्णपणे स्थिरावलेली असून तिच्या हालचाली व प्रकृती सामान्य असल्याच माहिती वन्यजीव विभागाने दिली आहे. (Nanded News)
आता वाघांची संख्या वाढण्यास होणार मदत
या उपक्रमामुळे अभयारण्यात वाघांची नैसर्गिक वाढ होण्यास चालना मिळणार असून पर्यटन क्षेत्रालाही मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. पैनगंगा अभयारण्यात १९९७ साली वाघाचे अस्तित्व नोंदविण्यात आले होते. त्यानंतर अनेक वर्षे वाघांचे ठोस पुरावे नव्हते. मात्र २०१९ मध्ये अधिकृतरीत्या नर वाघाची नोंद झाली. वनप्रेमींनी त्याला प्रेमाने ‘जॉनी’ असे नाव दिले. पीएनजी-१ या संकेतांकाने ओळखला जाणारा हा वाध खरबी वनपरिक्षेत्रात एकटाच अधिवास करत होता.
हे देखील वाचा : ‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…
उमरखेड-किनवट परिसरात रोजगाराच्या संधी
नैसर्गिक संवर्धनासाठी मादी वाघीण आवश्यक असल्याने स्थानिक वन्यजीव प्रेमींनी सातत्याने पाठपुरावा केला. ढाणकी (ता. उमरखेड) येथील वन्यजीव प्रेमी व छायाचित्रकार प्रतिक रमेश राठोड यांनी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन सादर करून जॉनीसाठी जोडीदार सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत विद्यमान वनमंत्री गणेश नाईक, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी महेश शेवाळे, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास -रेड्डी तसेच पांढरकवडा वन्यजीव विभागाने सखोल अभ्यास करून वाघीण सोडण्याचा निर्णय घेतला.
हे देखील वाचा : “मुद्दामून त्या पक्षाचे नेते त्यांना स्वत:च…; NCP विलीनीकरणावर रोहित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका
मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी, विभागीय वनाधिकारी उत्तम फड, सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र कोंडावार, खरबीचे वनपरिक्षेत्राधिकारी धीरज मदने, बिटरगावचे सुदर्शन पांडे, सोनधाबीचे रिद्धेश रोडगे, कोरटाचे विशाल झांबरे यांच्यासह चारही वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून हा प्रयोग यशस्वी झाला. पैनगंगा अभयारण्य नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असून वाघांची जोडी स्थिरावल्याने येथे पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमरखेड व किनवट तालुक्यातील आदिवासी युवकांना मार्गदर्शक, वाहनचालक, निवास व्यवस्था, खाद्यपदार्थ सेवा आदी क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वन्यजीव संवर्धनासोबतच स्थानिक आर्थिक विकासाला चालना देणारा हा प्रयोग राज्यासाठी आदर्श ठरणार असल्याचे वन्यजीव प्रेमींचे मत आहे.