• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dharashiv »
  • A Surge Of Substandard Work From Dharashiv Public Works Department

Dharashiv News : धाराशिवच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निकृष्ट कामांचा धडाका, गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी

ग्रामीण भागातील विविध विकासकामांमध्ये दर्जाहीन साहित्याचा वापर करून, निकृष्ट कामे करून शासनाचा निधी अपहार केला जात असल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 21, 2026 | 03:30 PM
धाराशिवच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निकृष्ट कामांचा धडाका

धाराशिवच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निकृष्ट कामांचा धडाका

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शीतलकुमार शिंदे, धाराशिव : येथील सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) काही अधिकारी व ठेकेदारांची संगनमताची लॉबी तयार झाल्याचा आरोप पुढे येत असून, शहर व ग्रामीण भागातील विविध विकासकामांमध्ये दर्जाहीन साहित्याचा वापर करून, निकृष्ट कामे करून शासनाचा निधी अपहार केला जात असल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

विविध कामांमध्ये दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

सध्या शहरात मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा काँक्रिट गटारी, पेव्हर ब्लॉक बसविणे, डांबरीकरण, तसेच ग्रामीण भागात काँक्रिट व डांबरी रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, या कामांमध्ये अंदाजपत्रकात नमूद केलेल्या प्रमाणापेक्षा कमी सिमेंट व डांबर वापरले जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रस्ते डांबरीकरणाच्या कामात डांबराचे प्रमाण अत्यल्प असल्याचा आरोप असून, काही ठिकाणी नव्याने केलेले रस्ते अल्पावधीतच उखडू लागल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी, टिकाव नसलेली कामे पुन्हा दुरुस्त करण्यासाठी अतिरिक्त निधी खर्च करावा लागत असल्याने शासनाच्या तिजोरीवर दुहेरी ताण पडत आहे.

Crime News: काजूच्या झाडाला गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

धाराशिव–बेंबळी–उजनी मार्गावरील कामांवरही आक्षेप

धाराशिव ते बेंबळी मार्गे उजनी या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामात सिमेंटऐवजी मोठ्या प्रमाणात ‘डस्ट’चा वापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. योग्य मिश्रण न केल्यास रस्त्याची मजबुती कमी होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. संबंधित कामांची तांत्रिक तपासणी व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

देखरेख यंत्रणेवर प्रश्न

पीडब्ल्यूडी अंतर्गत सुरू असलेल्या कामांवर कनिष्ठ अभियंता, उपअभियंता व उपविभागीय अभियंता यांची नियमित देखरेख असणे बंधनकारक आहे. अंदाजपत्रकानुसार काम पूर्ण झाले का, साहित्याची गुणवत्ता योग्य आहे का, याची तपासणी करणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र, काही अधिकारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी न जाता कार्यालयातूनच मोजमाप पुस्तके (Measurement Books) तयार करतात, असा आरोप आहे. यामुळे कामांचे योग्य मूल्यमापन होत नसून दर्जा तपासला जात नाही, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

कायदेशीर बाबी : कोणती कारवाई होऊ शकते?

भारतीय दंड संहितेचे कलम ४०९ प्रमाणे सार्वजनिक सेवकाने विश्वासघात करणे, कलम ४२० प्रमाणे फसवणूक करणे, कलम ४६८/४७१ प्रमाणे बनावट कागदपत्रे तयार करणे व वापरणे (जर मोजमाप पुस्तके खोटी आढळली तर) या नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते असे कायदेतज्ञांचे मत आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयानुसारही कारवाई होऊ शकते. त्यात शासकीय अधिकारी पदाचा गैरवापर करून आर्थिक लाभ घेतल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) मार्फत चौकशी होऊ शकते. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावलीनुसार अंदाजपत्रक, तांत्रिक मानके, दर्जा नियंत्रण (क्वालिटी कंट्रोल) आणि थर्ड पार्टी ऑडिट अनिवार्य आहे. नियमभंग झाल्यास प्रशासकीय कारवाई, निलंबन किंवा ब्लॅकलिस्टिंगची तरतूद आहे. माहितीचा अधिकार कायदयानुसार नागरिक संबंधित कामांची अंदाजपत्रके, मोजमाप पुस्तके, बिलांची प्रत मागवू शकतात. दस्तऐवजांतील तफावत उघड झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईची दारे उघडू शकतात. तर सीएजी/विभागीय लेखापरीक्षण केल्यास महालेखापरीक्षकांकडून (सीएजी) किंवा विभागीय लेखापरीक्षणातून आर्थिक अनियमितता आढळल्यास वसुली व दंडात्मक कारवाई शक्य आहे.

नागरिकांची मागणी

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून सर्व चालू कामांची तांत्रिक व आर्थिक चौकशी करावी, स्वतंत्र गुणवत्ता तपासणी (थर्ड पार्टी ऑडिट) करावी आणि दोषी अधिकारी-ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे. तसेच, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकावे व संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनासह विभागीय चौकशी करावी, अशीही मागणी पुढे येत आहे.

सार्वजनिक निधीतून होणारी विकासकामे ही जनतेच्या कररूपाने जमा झालेल्या पैशातून होत असतात. त्यामुळे या कामांचा दर्जा, पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. कथित गैरप्रकारांबाबत सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली, तरच नागरिकांचा शासनव्यवस्थेवरील विश्वास अबाधित राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Rahul Gandhi Bhiwandi Court:’माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’; राहुल गांधींच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं?

Web Title: A surge of substandard work from dharashiv public works department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra

संबंधित बातम्या

स्थानिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध; गावोवावी बैठका अन् सोशल मिडीयावर प्रचाराला सुरुवात
1

स्थानिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध; गावोवावी बैठका अन् सोशल मिडीयावर प्रचाराला सुरुवात

“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार…”, किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही
2

“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार…”, किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

Amravati News: १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेतच; उपाययोजनांची गरज, पीक नष्ट आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
3

Amravati News: १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेतच; उपाययोजनांची गरज, पीक नष्ट आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

“आरोग्य भरतीत स्थानिक वैद्यकीय एमबीबीएस पदवीधारकांनाच प्रथम प्राधान्य द्या…”, डॉ. सूर्यवंशी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
4

“आरोग्य भरतीत स्थानिक वैद्यकीय एमबीबीएस पदवीधारकांनाच प्रथम प्राधान्य द्या…”, डॉ. सूर्यवंशी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs SA, T20 World Cup: ‘मी मानसिकता बदलणार नाही..’ शून्यावर बाद होण्याची हॅट्रिक केल्यानंतर अभिषेक शर्माने सोडले मौन 

IND vs SA, T20 World Cup: ‘मी मानसिकता बदलणार नाही..’ शून्यावर बाद होण्याची हॅट्रिक केल्यानंतर अभिषेक शर्माने सोडले मौन 

Feb 21, 2026 | 05:20 PM
IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Feb 21, 2026 | 05:20 PM
Aurangabad Bench: एकल मातेच्या मुलीला मिळणार आईचे नाव आणि जात; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Aurangabad Bench: एकल मातेच्या मुलीला मिळणार आईचे नाव आणि जात; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Feb 21, 2026 | 05:17 PM
Konkan Ro-Ro Ferry: मुंबई-कोकण आता फक्त 6 तासांवर, रो-रो फेरी कुठून आणि कशी? काय आहेत तिकीट दर?

Konkan Ro-Ro Ferry: मुंबई-कोकण आता फक्त 6 तासांवर, रो-रो फेरी कुठून आणि कशी? काय आहेत तिकीट दर?

Feb 21, 2026 | 05:16 PM
राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, जिवाला धोका असतानाही…; हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावून सागितलं

राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, जिवाला धोका असतानाही…; हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावून सागितलं

Feb 21, 2026 | 05:15 PM
Airtel यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनी घेऊन आली धमाकेदार ऑफर, ‘या’ प्लॅन्समध्ये फ्री मिळणार Unlimited डेटा

Airtel यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनी घेऊन आली धमाकेदार ऑफर, ‘या’ प्लॅन्समध्ये फ्री मिळणार Unlimited डेटा

Feb 21, 2026 | 05:04 PM
SE Reservation: तेलंगणाने करून दाखवले, महाराष्ट्र का पिछाडीवर? SC आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अमित गोरखे आक्रमक

SE Reservation: तेलंगणाने करून दाखवले, महाराष्ट्र का पिछाडीवर? SC आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अमित गोरखे आक्रमक

Feb 21, 2026 | 05:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.