Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंबादास दानवेंचे निलंबन मागे घेणार का? दिलगिरी व्यक्त केल्यानंतर उपसभापती गोऱ्हे यांच्या निर्णयाकडे लक्ष

अंबादास दानवे यांचे विधान परिषदेमध्ये निलंबन करण्यात आले आहे. त्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त करणारे पत्र उपसभापती निलम गोऱ्हे यांना दिले आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 03, 2024 | 04:10 PM
अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यासमोर वर्तनाबद्दल व्यक्त केली दिलगिरी

अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यासमोर वर्तनाबद्दल व्यक्त केली दिलगिरी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र विधान परिषदेमध्ये विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचे सभागृहातून निलंबन करण्यात आले आहे. यामुळे राज्याचे राजकारण तापले असून विरोधकांनी निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील माफी मागितली आहेत. तसेच अंबादास दानवे यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवराळ भाषा वापरली. भाजप आमदार प्रसाद लाड व अंबादास दानवे यांच्यामधील शाब्दिक चमक विकोपाला गेली. यामध्ये दानवे यांनी सभागृहामध्ये शिवराळ भाषा वापरली. त्यामुळे अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले. सभागृहामध्ये याबाबत ठराव देखील मंजूर झाला. मात्र या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी महिला व उपसभापती यांची जाहीर माफी देखील मागितली आहे. यानंतर अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे.

गोऱ्हेंना दिले दिलगिरीचे पत्र 

सभागृहामध्ये अर्वाच्च भाषा वापरल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणार पत्र विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी लिहिले आहे. त्यांनी स्वतः उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेत हे दिलगिरीचे पत्र सुपूर्द केले आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचे देखील हे निलंबन मागे घेण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्यांची शिक्षा कमी करावी अशी मागणी विरोधक करत आहेत. आमदार अनिल परब यांनी देखील सभागृहामध्ये दानवे यांचे निलंबन मागे घेण्यात यावी अशी विनंती केली. दिलगिरीचे पत्र दिल्यानंतर अंबादास दानवे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

काय घेणार निर्णय?

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, ‘त्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी आधीच भूमिका मांडली आहे. माझ्या तोंडून काही शब्द निघाले असतील तर स्वतः माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सभागृहाचं पावित्र्य राखताना माझ्याकडून काही चुकीचं झालं असेल. हे पावित्र्य राखण्यासाठी माझी सभागृहात दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी आहे,’ असे मत अंबादास दानवे यांनी मांडले. दिलगिरी व्यक्त केल्यानंतर अंबादास दानवे यांचे पाच दिवसांचे निलंबन मागे होणार का आणि नीलम गोऱ्हे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: From ambadas danve apology letter to neelam gorhe for abusing prasad lad suspension case nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2024 | 04:10 PM

Topics:  

  • Monsoon Session
  • Neelam Gorhe

संबंधित बातम्या

Ganpati Festival: “गणेशोत्सव काळात नागरिकांना सतर्क…”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आवाहन
1

Ganpati Festival: “गणेशोत्सव काळात नागरिकांना सतर्क…”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आवाहन

Maharashtra News: “मानवी तस्करीसारख्या गुन्हेगारीला…”; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विधान
2

Maharashtra News: “मानवी तस्करीसारख्या गुन्हेगारीला…”; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विधान

पहलगाममध्ये दहशतवादी आलेच कसे? हल्ल्यानंतर पळून जाण्यास कोणी मदत केली? : गौरव गोगोईंचे संसदेत सवाल
3

पहलगाममध्ये दहशतवादी आलेच कसे? हल्ल्यानंतर पळून जाण्यास कोणी मदत केली? : गौरव गोगोईंचे संसदेत सवाल

मोठी बातमी! अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, कारणही सांगितलं
4

मोठी बातमी! अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, कारणही सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.