Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपघाती मृत्यू रोखण्यात गडचिरोली ‘टॉप’ला; नागपूरचीही उल्लेखनीय कामगिरी

जिल्ह्यात २०२५ मध्ये १२९ प्राणांतिक अपघातांची नोंद झाली होती. मात्र, २०२६ मध्ये ही संख्या ९६ वर आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. नागपूर जिल्ह्यानेही अपघाती मृत्यू रोखण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 07, 2026 | 02:47 PM
अपघाती मृत्यू रोखण्यात गडचिरोली 'टॉप'ला; नागपूरचीही उल्लेखनीय कामगिरी

अपघाती मृत्यू रोखण्यात गडचिरोली 'टॉप'ला; नागपूरचीही उल्लेखनीय कामगिरी

Follow Us
Follow Us:
  • रस्ते अपघाती मृत्यू कमी करण्यात गडचिरोली राज्यात अव्वल
  • नागपूर जिल्ह्याला राज्यात दुसरे स्थान
  • गडचिरोलीत अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात २६ टक्के घट
गडचिरोली : रस्त्यांवरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यात विदर्भातील गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. राज्यभरात रस्ते अपघातांतील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यात आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर नागपूर जिल्ह्याने राज्यात दुसरे स्थान मिळवले आहे. गडचिरोली जिल्ह्यात अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात तब्बल २६ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली असून, या कामगिरीमुळे जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे.

जिल्ह्यात २०२५ मध्ये १२९ प्राणांतिक अपघातांची नोंद झाली होती. मात्र, २०२६ मध्ये ही संख्या ९६ वर आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. नागपूर जिल्ह्यानेही अपघाती मृत्यू रोखण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यात प्राणांतिक अपघातांची संख्या गेल्या वर्षीच्या ८१३ वरून यंदा ७०८ वर आली आहे. तसेच, गेल्या वर्षी ३८५ अपघाती मृत्यूंची नोंद झाली होती. यंदा हा आकडा २९५ वर आला असून, मृत्यूंच्या प्रमाणात २३ टक्क्यांची घट झाली आहे. याशिवाय, नागपूर जिल्ह्यातील एकूण रस्ते अपघातांच्या संख्येतही १३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणनेदेखील अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करणाऱ्या राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविले आहे.

दरम्यान, राज्यातील धाराशिव जिल्ह्यात अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात २१ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली असून, जिल्ह्याने तिसरे स्थान पटकाविले आहे. धाराशिवमधील अपघाती मृत्यूंची संख्या ३३५ वरून २६४ वर आली आहे. तर नाशिक शहर आणि अकोला येथेही अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात प्रत्येकी २० टक्क्यांची घट झाली आहे.

26 टक्क्यांनी मृत्यूच्या प्रमाणात घट

नागपूर जिल्ह्यात गंभीर जखमी होणाऱ्यांच्या संख्येतही काही प्रमाणात घट झाली आहे. गतवर्षी ८५५ जण गंभीर जखमी झाले होते. यंदा ही संख्या ८४४ वर आली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते अपघाती मृत्यूंच्या संख्येत चार टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. राज्यातील अपघाती मृत्यूंचा आकडा १३ हजार १७५ वरून १२ हजार ६४५ वर आला आहे. रस्ता सुरक्षा उपाययोजना आणि जनजागृती मोहिमांमुळे ही सकारात्मक सुधारणा झाल्याचे चित्र आहे.

FAQ

1. रस्ते अपघातांतील मृत्यू कमी करण्यात कोणता जिल्हा राज्यात अव्वल ठरला?
गडचिरोली जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

2. गडचिरोलीत प्राणांतिक अपघात किती कमी झाले?
२०२५ मधील १२९ प्राणांतिक अपघातांची संख्या २०२६ मध्ये ९६ वर आली आहे.

3. गडचिरोलीत अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात किती घट झाली?
अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात २६ टक्क्यांची घट झाली आहे.

Web Title: Gadchiroli ranks at top in preventing accidental deaths nagpur also delivers a notable performance nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Gadchiroli News
  • Road Accident

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मोठे पाऊल! सासवडमध्ये देशातील पहिले अत्याधुनिक रस्ते सुरक्षा केंद्र उभारणार
1

Pratap Sarnaik: रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मोठे पाऊल! सासवडमध्ये देशातील पहिले अत्याधुनिक रस्ते सुरक्षा केंद्र उभारणार

धक्कादायक ! प्रियकराने दगा दिल्याने तरुणी नैराश्येत; गळफास घेऊन संपवले जीवन
2

धक्कादायक ! प्रियकराने दगा दिल्याने तरुणी नैराश्येत; गळफास घेऊन संपवले जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.