Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik: रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मोठे पाऊल! सासवडमध्ये देशातील पहिले अत्याधुनिक रस्ते सुरक्षा केंद्र उभारणार

Pratap Sarnaik: देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यातील सासवड येथे उभारण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रस्तावित प्रकल्पाची पाहणी करून केंद्र दर्जेदार आणि अत्याधुनिक करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 02, 2026 | 04:03 PM
रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मोठे पाऊल! सासवडमध्ये देशातील पहिले अत्याधुनिक रस्ते सुरक्षा केंद्र उभारणार

रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मोठे पाऊल! सासवडमध्ये देशातील पहिले अत्याधुनिक रस्ते सुरक्षा केंद्र उभारणार

Follow Us
Follow Us:
  • देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र सासवड येथे उभारणार!
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून प्रकल्पाची पाहणी;
  • केंद्र दर्जेदार आणि अत्याधुनिक करण्यासाठी मार्गदर्शन
पुणे : देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र (Road Safety Training and Research Institute) सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे येथे उभारण्यात येत असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. केंद्राची उभारणी दर्जेदार, अत्याधुनिक आणि प्रभावी व्हावी, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. (Pratap Sarnaik)

या पाहणीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र (Automated Testing Station – ATS), स्वयंचलित वाहनचालक चाचणी मार्ग (Automated Driving Testing Track – ADTT) तसेच प्रस्तावित रस्ता सुरक्षा प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या कामांचा आढावा घेतला.

मोशीच्या कचरा प्रश्नावर महापालिकेसह राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार; आमदार महेश लांडगे यांचे आश्वासन

स्वयंचलित चाचणी केंद्रात सेन्सर्स

सासवड येथील २५ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे वाहनांची तांत्रिक तपासणी आणि चालकांची चाचणी अधिक पारदर्शक, अचूक व वैज्ञानिक पद्धतीने होणार आहे. स्वयंचलित चाचणी केंद्रात सेन्सर्स आणि कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांचे ब्रेक, सस्पेन्शन, दिवे आणि उत्सर्जन यांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे वाहनांच्या फिटनेस तपासणीसाठी लागणारा वेळ कमी होऊन रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल.

स्वयंचलित वाहनचालक चाचणी मार्गावर ८ आकाराचा मार्ग, एच आकाराचा मार्ग, चढ-उतार आणि वळणांचे ट्रॅक अशा विविध चाचण्यांद्वारे चालकांच्या कौशल्याचे मूल्यमापन केले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि व्हिडिओ ॲनालिटिक्सच्या साहाय्याने या चाचण्या घेतल्या जाणार असल्याने चालकांना परवाना देण्याची प्रक्रिया अधिक वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह होईल.

बदलते मोटार वाहन

राज्य रस्ता सुरक्षा प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातून मोटार वाहन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, बदलते मोटार वाहन कायदे, रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढण्यासोबतच रस्ता सुरक्षा विषयक कामकाज अधिक प्रभावी होईल.

“रस्ते अपघात कमी करण्यासाठी केवळ नियमांची अंमलबजावणी पुरेशी नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. सासवड येथील हे केंद्र देशासाठी आदर्श ठरेल, अशा दर्जाने उभारले पाहिजे,” असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिले. या केंद्रामुळे वाहनांची सुरक्षितता, चालकांचे कौशल्य आणि रस्ता सुरक्षा व्यवस्थेची गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार असून, महाराष्ट्राच्या रस्ता सुरक्षा क्षेत्रात हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Sambhajinagar News : जिल्ह्यातील ४ हजार ३३ शाळांचे मूल्यांकन; ८ शाळांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी

💡

Frequently Asked Questions

  • Que: देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र कुठे उभारण्यात येणार आहे?

    Ans: देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यातील सासवड येथे उभारण्यात येणार आहे.

  • Que: या प्रस्तावित केंद्राची पाहणी कोणी केली?

    Ans: महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकल्पाची पाहणी केली.

  • Que: रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचा मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: रस्ते सुरक्षेसंदर्भातील संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देणे तसेच रस्ते सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा विकसित करणे हा या केंद्राचा उद्देश आहे.

Web Title: India first road safety research and training centre to be established in saswad sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • maharashtra
  • pratap sarnaik
  • Pune
  • Road Accident

संबंधित बातम्या

मोशीच्या कचरा प्रश्नावर महापालिकेसह राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार; आमदार महेश लांडगे यांचे आश्वासन
1

मोशीच्या कचरा प्रश्नावर महापालिकेसह राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार; आमदार महेश लांडगे यांचे आश्वासन

Parbhani News: परभणी मनपा कर्मचाऱ्यांचे पुन्हा बेमुदत कामबंद आंदोलन! विविध विभाग कडकडीत बंद
2

Parbhani News: परभणी मनपा कर्मचाऱ्यांचे पुन्हा बेमुदत कामबंद आंदोलन! विविध विभाग कडकडीत बंद

BH नंबर प्लेटचा फायदा काय? कोणाला मिळते आणि अर्ज कसा करायचा? दुसऱ्या राज्यात गेल्यावर गाडीची पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही!
3

BH नंबर प्लेटचा फायदा काय? कोणाला मिळते आणि अर्ज कसा करायचा? दुसऱ्या राज्यात गेल्यावर गाडीची पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही!

Maharashtra Weather: कुठे मुसळधार, तर कुठे थेंबही नाही! महाराष्ट्रातील पावसाचे आकडे सांगतात भविष्यातील संकट
4

Maharashtra Weather: कुठे मुसळधार, तर कुठे थेंबही नाही! महाराष्ट्रातील पावसाचे आकडे सांगतात भविष्यातील संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.