Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! प्रियकराने दगा दिल्याने तरुणी नैराश्येत; गळफास घेऊन संपवले जीवन

आत्महत्या करताना लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे ५२ दिवसानंतर प्रकरणाचा उलगडा करत कुरखेडा पोलिसांनी गुरुवारी दोन्ही आरोपींना अटक केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 01, 2026 | 08:41 AM
धक्कादायक ! प्रियकराने दगा दिल्याने तरुणी नैराश्येत; गळफास घेऊन संपवले जीवन

धक्कादायक ! प्रियकराने दगा दिल्याने तरुणी नैराश्येत; गळफास घेऊन संपवले जीवन

Follow Us
Follow Us:
  • गडचिरोली येथे प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरुणीची आत्महत्या 
  •  

    पोलिस भरतीची तयारी करत असताना तरुणी आणि एका तरुणाची ओळख झाली

  • ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
गडचिरोली : पोलिस भरतीची तयारी करताना जुळलेली मनं, त्यातून लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेले प्रेम, पण त्या दोघांमध्ये तिसरीची एंट्री झाल्याने प्रेम आणि विश्वासाला गेलेला तडा, हे सर्व सहन न झाल्याने तरुणीने आत्महत्या केली. याप्रकरणी प्रियकर असलेल्या पोलिस शिपायासह एका महिला पोलिस शिपायाला अटक करण्यात आली.

आत्महत्या करताना लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे ५२ दिवसानंतर प्रकरणाचा उलगडा करत कुरखेडा पोलिसांनी गुरुवारी दोन्ही आरोपींना अटक केली. शिवकुमार छोटेलाल करसायल (वय २८, रा. टेमली ता. कोरची) व अश्विनी राऊत (वय २६, रा. बोडधा, ता. देसाईगंज) अशी पोलिस शिपाई असलेल्या आरोपींची नावे आहेत. कुरखेडा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या आंजनटोला या गावातील तरुणीने गेल्यावर्षी पोलिस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून जिल्हा मुख्यालय गडचिरोलीत सराव सुरू केला. लांझेडा भागात ती भाड्याच्या खोलीत राहत होती. अशातच इन्स्टाग्रामवर तिची ओळख शिवकुमार छोटेलाल करसायल या तरुणाशी झाली.

शिवकुमारसुद्धा पोलिस भरतीची तयारी करत असल्याने मैदानावर दोघांची जवळीकता वाढून दोघेही प्रेमात आकंठ बुडाले. दरम्यान, पोलिस भरतीत शिवकुमारची निवड झाली, पण त्याच्या प्रेयसीची निवड होऊ शकली नाही. पोलिस भरतीत निवड न झाल्याने तरुणीने आपले गाव गाठले, पण शिवकुमारशी असलेले प्रेमसंबंध कायम होते. भविष्यात आपलीही पोलिस भरतीत निवड होण्यासह शिवकुमारशी लग्नही होईल या आशेवर ती होती.

पीडितेच्या आईने केली कारवाईची मागणी

तरुणीच्या आईने पोलिस तक्रारीत आत्महत्येमागील कारणांचा उल्लेख करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. तक्रारी व चिठ्ठीच्या आधारावर कुरखेडा पोलिसांनी सर्व घटनाक्रमाची सत्यता पडताळून ५२ दिवसांनी पोलिस शिपाई शिवकुमार आणि महिला पोलिस शिपाई अश्विनी यांना तरुणीच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करीत अटक केली.

लग्नास नकार दिल्याने गेली होती नैराश्येत

शिवकुमारची ओळख गडचिरोली पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस शिपाई अश्विनी राऊत हिच्याशी झाली. परिणामी, शिवकुमार प्रेयसीपासून दुरावू लागला. त्याने लग्न करण्यासही नकार दिल्याने तरुणी नैराश्येत गेली. त्यातच महिला शिपाई अश्विनीने तिला फोन करून अपमानास्पद भाषेत तिची खरडपट्टी काढली. यामुळे ती तरुणी पूर्णपणे खचली. ज्याच्यावर प्रेम केले त्यानेच धोका दिल्याने नैराशेत असलेल्या युवतीने ७ सप्टेंबरला आपल्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवली.

FAQ

१. तरुणीच्या आत्महत्येची घटना कुठे घडली?

ही घटना गडचिरोली येथे घडली.

२. तरुणीची आणि तिच्या प्रियकराची ओळख कशी झाली होती?

पोलिस भरतीची तयारी करत असताना दोघांची ओळख झाली होती.

३. दोघांनी कोणता निर्णय घेतला होता?

दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: Girl dies by suicide following a love triangle nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 08:41 AM

Topics:  

  • crime news
  • Gadchiroli News
  • Suicide case

संबंधित बातम्या

प्रेमविवाहानंतर पोलिस ठाण्याच्या गेटवर दोन्ही गट भिडले, तुंबळ हाणामारी; 30 जणांवर गुन्हा
1

प्रेमविवाहानंतर पोलिस ठाण्याच्या गेटवर दोन्ही गट भिडले, तुंबळ हाणामारी; 30 जणांवर गुन्हा

दोन महिन्यांपूर्वी तरुणाचे अपहरण, आता पोलिसांत तक्रार; गेवराईतील घटनेनं खळबळ
2

दोन महिन्यांपूर्वी तरुणाचे अपहरण, आता पोलिसांत तक्रार; गेवराईतील घटनेनं खळबळ

माहेरून 10 लाख आणण्यासाठी छळ, पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीचे कपडे फाडले; मुलीलाही घराबाहेर काढले
3

माहेरून 10 लाख आणण्यासाठी छळ, पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीचे कपडे फाडले; मुलीलाही घराबाहेर काढले

18 लाखांसाठी मित्रावर जीवघेणा हल्ला, नाकाचे हाड फ्रॅक्चर; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
4

18 लाखांसाठी मित्रावर जीवघेणा हल्ला, नाकाचे हाड फ्रॅक्चर; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.