सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : राज्यातील राजकीय नाट्य वळणावळणावर रूप बदलत (Maharashtra Politics Changes) आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने मविआ सरकार अल्पमतात येऊन कोसळले (The Rebellion Toppled The MVA Government Into A Minority). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नैतिकता दाखवत आपल्या पदाचा राजीनामा (Resignation) बुधवारी रात्री दिला आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलेले पाहण्यास मिळाले.
एकीकडे राज्यात भाजपाच्या बाजूने वातावरण असतानाच; दुसरीकडे नवी मुंबईत (Navi Mumbai) देखील भाजपाच्या (BJP) गोटात आनंद व्यक्त केला जात आहे. त्यात आगामी नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका (NMMC Elections) पाहता गणेश नाईकांना (Ganesh Naik) मंत्रीपद मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्याने नाईक समर्थकांमध्ये उत्साहाला उधाण आले आहे.
२०१९ सली युती फिस्कटल्यावर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचा अनैसर्गिक सत्ता प्रयोग अस्तित्वात आला. मविआ सरकार सत्तेत आल्यापासून भाजपाकडून हे सरकार कोसळण्याच्या वल्गना केल्या जात होत्या. त्यात कोरोनाचे संकट देखील पार पडले. मात्र तरीही अडीच वर्षे हे सरकार चालवण्यात मविआ सरकारला यश आले. २०१४ साली भाजपाचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर यांच्यासोबत व काँग्रेसचे राज्यातील कमी होत असलेले जनमत पाहता २०१९ च्या निवडणणुकांमध्ये भेटी, मातब्बर नेत्यांनी भाजपा व शिवसेनेला पसंती दिली.
त्यानुसार नवी मुंबईत देखील पुत्र आग्रहाखातर गणेश नाईकांनी शरद पवारांचा घरोबा सोडून भाजपात जाणे पसंत केले. या प्रयोगाची चाचपणी २०१४ सालीच झाल्याचे आरोप देखील नाईक यांच्यावर त्यांचे विरोधक जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.
मात्र तो योग अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढत्या जवळकीने २०१९ साली जुळून आल्याचे पाहण्यास मिळाले होते. त्यामागे एकहाती पालिकेची सत्ता मिळवून देण्याचे अलिखित आश्वासन नाईकांकडून देण्यात आले होते. तर त्यातून माजी खासदार संजीव नाईक व माजी आमदार संदीप नाईक यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे मनसुबे देखील आखले जात होते.
मात्र राजकारणात काहीही घडू शकते याचा प्रत्यय सध्या महराष्ट्रात दिसून आला. मविआचा प्रयोग यशस्वी झाला आणि; सर्वाधिक आमदार निवडून आणणाऱ्या भाजपाला विरोधी बाकावर बसावे लागले. त्यामुळे नवी मुंबईत नाईक समर्थकांत चिंतेचे वातावरण होते.
५ वर्ष काहीसे राजकारणाबाहेर राहून विजनवासात घालवल्यावर नाईक हे मंत्री होतील त्याचा फायदा पालिका निवडणुकीत होऊ शकतो अशी भावना नाईक समर्थकांत पाहायला मिळत होती. मविआचे सरकार स्थापन होऊन स्थानिक स्वराज्य संस्था देखील माविआ एकत्र लढण्याच्या घोषणेने अनेक नाईक समर्थकांनी त्यांची साथ सोडत राष्ट्रवादी व शिवसेनेचा मार्ग पत्करला. त्यामुळे नाईकांना पालिकेतील सत्तेचे गणित अवघड जाणार अशी चिन्हे दिसत होती.
राज्यात बिघडलेल्या गणितांचा फटका पालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच आता पुन्हा भाजपा सत्तेत येत असल्याने पुन्हा नव्या राजकीय गणिते नवी मुंबईत पाहण्यास मिळणार आहेत. त्यासोबत गणेश नाईकांच्या मंत्रीपदाच्या चर्चा झडू लागल्या आहेत. त्यामुळे समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
भाजपाला मुंबई सोबत एमएमआर मधील पालिकांवर देखील वर्चस्व गाजवायचे आहे. एकनाथ शिंदे यांचे नवी मुंबई वगळता इतर पालिकांवर वर्चस्व आहे. नवी मुंबईत गणेश नाईकांना मविआमुळे निर्माण झालेला अडथळा शिंदे गटामुळे कमी होणार आहे. नवी मुंबईतील ऐरोली दिघ्यातील शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. शपथविधी नंतर ते चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र हे गणित गणेश नाईकांच्या पथ्यावर पडणार आहे.
एकीकडे नाईक समर्थकांमध्ये दादांच्या मंत्री पदाच्या अशा पल्लवीत झालेल्या असल्या तरी दुसऱ्या बाजूने; आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांचे देखील महत्व अबाधित आहे. किंबहुना गणेश नाईक यांचे तिकिट कापून पक्षाने सूचक संदेश दिलेला अवघ्या राज्याने पहिला आहे. त्यामुळे एका बाजूने मंत्री पद जरी मिळण्याची शक्यता वाढलेली असली तरी थेट देवेंद्र फडणवीसांच्या दरबारात मानाचे स्थान मंदा म्हात्रे यांना असणार आहे. त्यामुळे पालिका निवडणुकात जुन्या भाजपातील इच्छुकांसोबत बेलापूर मतदार संघातील नाईक समर्थकांची मदार मंदा म्हात्रे यांच्यावर असणार आहे.
नवी मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता आणण्याच्या स्वप्नांवर देखील महाविकास आघाडीने गंडांतर येणार की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भाजपात येण्याचा निर्णय चुकला की काय अशी चिंता खुद्द नाईक समर्थक नगरसेवकांमध्ये सुरू होती. त्यातून नाईक समर्थकांचे पक्षांतर घडले होते. मात्र पून्हा सुगीचे दिवस आल्याने घर वापसीची शक्यता वाढली आहे.