Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालखी मार्गस्थ झाल्यानंतर दोन तासांतच माळेगाव चकाचक; नगरपंचायतीकडून 6 टन कचऱ्याचे संकलन

माझी वसुंधरा अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या माळेगाव नगरपंचायतीने आपल्या लौकिकास साजेसे काम करत संत सोपानकाका पालखी मार्गस्थ होताच दोन तासांत सहा टन कचरा गोळा करून शहर चकाचक केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 14, 2024 | 01:28 PM
पालखी मार्गस्थ झाल्यानंतर दोन तासांतच माळेगाव चकाचक; नगरपंचायतीकडून 6 टन कचऱ्याचे संकलन
Follow Us
Close
Follow Us:

माळेगाव : माझी वसुंधरा अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या माळेगाव नगरपंचायतीने आपल्या लौकिकास साजेसे काम करत संत सोपानकाका पालखी मार्गस्थ होताच दोन तासांत सहा टन कचरा गोळा करून शहर चकाचक केले. कचरा गोळा करण्यासाठी एन. डी. के मक्तेदार कडूनही मदत करण्यात आली.

वैष्णवभक्तांना अन्नदानासह अल्पोपहार

संत सोपानकाका पालखी सोहळा मंगळवारी माळेगाव मुक्कामी होता. यावेळी स्वयंसेवी संस्था व इतरांनी वैष्णवभक्तांना अन्नदानासह अल्पोपहार वाटला. यावेळी जेवणासाठी वापरण्यात आलेल्या पत्रावळी, पेपर डिश, प्लास्टिक ग्लास, चहाचे ग्लास, खाद्यपदार्थांचे प्लास्टिक कागद, देवासाठी वापरलेले हार, फुले आदींसह खेळण्यांचे कागद व बैलांची वैरण असा कचरा साठला होता. दुसऱ्या दिवशीही तोच कचरा व पालखी सजावटीनंतर झालेला कचरा मोठ्या प्रमाणात सर्वत्र साचला होता.

पालखी बारामतीकडे मार्गस्थ होताच अवघ्या दोन तासांत नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचारी व ठेकेदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचा परिसर चकाचक केला. स्वच्छता विभाग सुपरवायझर सुरेश सावंत, मुकादम संजय रिटे, एन.डी.के.मुकादम महेश पवार यांनी याचे नियोजन केले होते. विविध शैक्षणिक संस्था यामार्फत नीरा-बारामती रस्ता, अमरसिंह कॉलनी रस्ता, मुलींची मराठी शाळा परिसरातील सर्व कचरा गोळा केला. हा कचरा नगरपंचायतीच्या स्वाधीन करून त्यांनी सामाजिक कर्तव्य पार पाडले.

Web Title: Garbage in malegaon was cleared within two hours after the palanquin set off nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2024 | 01:28 PM

Topics:  

  • maharashtra
  • Malegaon

संबंधित बातम्या

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका
1

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
2

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
3

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
4

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.