Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणेकरांचे श्रद्धास्थान घंटाळी देवी मंदिर

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 27, 2022 | 12:47 PM
ठाणेकरांचे श्रद्धास्थान घंटाळी देवी मंदिर
Follow Us
Follow Us:

ठाणे : ठाणे शहराला (Thane City) खूप जुना इतिहास असून शहराला ऐतिहासिक आणि प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला आहे. ठाणे रेल्वे स्थानकापासून अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावर असलेले घंटाळी देवी मंदिर ठाण्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. ठाण्याच्या १८८२ च्या गॅझेटनुसार हे मंदिर २५० ते ३०० वर्षांपूर्वीचे असल्याचा उल्लेख आढळतो. घंटाळी देवीची (Ghantali Devi) मूर्ती स्वयंभू असून हे जागृत स्थान मानले जाते.

मंदिराची बाह्य रंगरंगोटी आणि साधे बांधकाम भाविकांच्या मनाला शांती प्रदान करते. मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सव मोठय़ा थाटात साजरा केला जातो. नवरात्रोत्सवातच्या काळात केवळ ठाणेकरच नाही तर मुंबई उपनगरतील समस्त भाविक मोठय़ा श्रद्धेने येथे दर्शनासाठी येत असतात.

घंटाळी देवीच्या मंदिरातील गाभाऱ्यात महिषासुर, घंटाळी देवी आणि दुर्गा अशा तिन्ही देवीच्या मूर्ती एकाच आसनावर आहेत. देवीच्या गाभाऱ्याच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड असून बाजूला राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मुर्त्या आहेत. पुरातन मुर्त्या पाहण्यासाठी इतर दिवशी देखील भाविक आवर्जून मंदिराला भेट देत असतात. पूर्वी मंदिराची मालकी ही रावसाहेब कोठारे यांच्याकडे होती मात्र त्याच्या पश्च्यात मंदिराची मालकी नात कस्तुरीबाई झावबा यांच्याकडे आहे. तर गेली ६३ वर्ष अनिल आणि श्रीपाद जोशी हे बंधू पुजारी म्हणून कार्य करीत आहेत.

मंदिराचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे मंदिराच्या प्रांगणात ‘कैलाशपती’ नावाचा पुरातन वृक्ष. या वृक्षावर उमलणारे फुल शंकराच्या पिंडीसारखे दिसत असून त्याचा सुवास मंत्रमुद्ध करणारा असतो. झाडाची पाने आणि बुंध्यापासून फांद्यापर्यंत शंकराच्या जटांसारख्या फुटलेल्या लहान पारंब्या यामुळे वृक्षाचे वेगळेपण सर्वांना आकर्षित करते.

दरवर्षी नवरात्राचे नऊदिवस येतेच विशेष व्यवस्था केली जाते. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे पाच वाजता घट बसवून मंदिरात पूजा केली जाते. दरवर्षीप्रमाणे पंचमीच्या दिवशी देवीचा गोंधळ, अष्टमीला होम हवन तर सप्तशांतील पाठ आणि भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

Web Title: Ghantali devi temple is the worshiped holy place of thanekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2022 | 12:47 PM

Topics:  

  • thane

संबंधित बातम्या

Thane News: भिवंडीत मद्य तस्करांना मोठा दणका; कंटेनरसह 1.90 कोटींचा विदेशी मद्यसाठा जप्त
1

Thane News: भिवंडीत मद्य तस्करांना मोठा दणका; कंटेनरसह 1.90 कोटींचा विदेशी मद्यसाठा जप्त

Thane Crime: संतापजनक! बाथरूमच्या खिडकीतून महिलांचे गुप्त व्हिडीओ केले शूट; आरोपी फरार
2

Thane Crime: संतापजनक! बाथरूमच्या खिडकीतून महिलांचे गुप्त व्हिडीओ केले शूट; आरोपी फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.