
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं काय घडलं?
घडलेली घटना ८ जून रोजी उशिरा सारंग गावातील एका बंगल्यात घडली. त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपीने, आपला मोबाईल फोन बाथरूमच्या खिडकीला काठीचा आधार घेत टेकवून उभा केला आणि किशोरवयीन मुलीची आई आणि मावशीचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. घरात उपस्थित असलेल्या एका १६ वर्षीय मुलीला संशयित आरोपीने व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे लक्षात आले, तेव्हा हे घडलेले प्रकरण उघडकीस आले. नंतर पीडितेने पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घंटेचे गांभीर्य ओळखून भारतीय दंड संहिता कलम 77 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर मुलगी अल्पवयीन असल्याने आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा फरार असल्याने त्याचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास पोलीस करत आहे.
ठाण्यात 12 तासांत दोन हत्यांनी खळबळ; मासुदा तलावाजवळ दगडाने ठेचून व्यक्तीची हत्या
ठाणे जिल्हात १२ तासांनी दोन हत्यांनी खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील नेहमी गर्दीने फुललेल्या मासुदा तलाव परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही आहे. अज्ञात हल्लेखोरांनी या व्यक्तीची हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे. पण, मासुदा तलावाच्या परिसरात ही घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दुसरी हत्या
दुपारी ३ वाजेच्या सुमारास DAV शाळेजवळ एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. साहिल पांचाळ असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. साहिल पांचाळ (वय १९) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव काय आहे. शाळेमधील मुलांची कुठल्या तरी कारणावरून मारामारी झाली होती. त्यांनतर या टोळक्याने साहिल पांचाळ यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. साहिल पांचाळ याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. साहिलची हत्या का करण्यात आली होती. याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणे पोलीस करत आहे.
Ans: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील सारंग गावात ही घटना घडली.
Ans: आरोपीने बाथरूमच्या खिडकीतून महिलांचे गुपचूप अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे.
Ans: पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.