Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Girgaon Chowpatty: गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पाहुण्यांचाही सहभाग, पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम

Girgaon Chowpatty : राज्य पर्यटन विभागाच्या वतीने ऐतिहासिक गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्थीच्या दिवशी परदेशी पर्यटकांसाठी एक दालन उभारण्यात येणार आहे. या दानलाच्या माध्यमातून परदेशी पर्यटकाना महाराष्ट्राची संस्कृती जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 23, 2026 | 08:40 PM
Girgaon Chowpatty: गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पाहुण्यांचाही सहभाग, पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम

Girgaon Chowpatty: गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पाहुण्यांचाही सहभाग, पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम

Follow Us
Follow Us:
  • परदेशी पर्यटकांसाठी गिरगाव चौपाटीवर विशेष दालन
  • महाराष्ट्राची संस्कृती परदेशात पोहचवण्याचे ध्येय
  • पर्यटन विभागाचा स्तुत्य उपक्रम 
 

अनंत चतुर्दशी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना अनेक चौपाट्या, तलाव गजबजून जाणार आहेत. अशात ऐतिहासिक अशा गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) येथे पार पडणाऱ्या भल्य गणेश विसर्जन साहळ्याचा परदेशी पर्यटकांनाही अनुभव घेता यावा म्हणून राज्य शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे येते एक विशेष दालन उभारण्यात येणार आहे.

या विशेष दालनाच्या माध्यमातून परदेशी पाहुण्यांना आपली समृद्ध सांस्कृतिक परंपरा, गणेशोत्सवाचे ऐतिहासिक व अध्यात्मिक महत्त्व तसेच विसर्जन सोहळ्याचे भव्य स्वरूप जवळून अनुभवता येणार आहे. यंदा गणेश विसर्जनाचा भव्य सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक हे गिरगाव चौपाटी येथे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी त्यांना गणपती मिरवणुकीचे दर्शन घेण्याबरोबरच गणरायाची पूजा, आरती आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तिमय वातावरणामध्ये पर्यटकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडणार आहे.

राज्यातील पर्यटनास चालना मिळेल

याबाबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, समृद्ध सांस्कृतिक परंपरा हे राज्याच्या पर्यटनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक परंपरा आणि उत्सवांचा आंतरराष्ट्रीय पर्यटकांना परिचय करून देण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
गणेशोत्सवासारख्या लोकसहभागातून साजऱ्या होणाऱ्या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख परदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अशा उपक्रमांना प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक पर्यटनाच्या माध्यमातून राज्यातील पर्यटनवाढीस चालना देण्यात येत आहे.

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचेल

पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव, संजय खंदारे (भा.प्र.से.) म्हणाले की, गिरगाव चौपाटी येथे जे विशेष दालन उभारण्यात येणार आहे, त्याच्या माध्यमातून गणेशोत्सवाची ऐतिहासिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक पार्श्वभूमी पर्यटकांना समजावून सांगण्यात येणार आहे. अशा उपक्रमांमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे प्रसार होण्यास मदत होईल.

तसेच पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे (भा.प्र.से.) यांनी सांगितले की, गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा महत्त्वपूर्ण अनुभव आहे. विशेष दालनाच्या माध्यमातून परदेशी पर्यटकांना गणेशोत्सवाच्या विविध पैलूंची माहिती तसेच विसर्जन सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

Web Title: Girgaon chowpatty foreign guests part in ganesh immersion ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • Foreign Tourist
  • Ganeshotsav 2026

संबंधित बातम्या

Pune Ganeshotsav: पुण्यात PMPML चे बस मार्ग बदलले; ‘ही’ ५ बसस्थानके तात्पुरती स्थलांतरित
1

Pune Ganeshotsav: पुण्यात PMPML चे बस मार्ग बदलले; ‘ही’ ५ बसस्थानके तात्पुरती स्थलांतरित

Ganeshotsav: ‘वक्रतुंड’ ते ‘माता महाकाली’! रथ, पालख्या अन्…; लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सज्ज
2

Ganeshotsav: ‘वक्रतुंड’ ते ‘माता महाकाली’! रथ, पालख्या अन्…; लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सज्ज

भक्तीला जनजागृतीची जोड! गणेश दर्शनासोबत योजनांची माहिती! ‘लोकसंवाद २०२६’मधून नागरिकांना थेट मार्गदर्शन
3

भक्तीला जनजागृतीची जोड! गणेश दर्शनासोबत योजनांची माहिती! ‘लोकसंवाद २०२६’मधून नागरिकांना थेट मार्गदर्शन

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा
4

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.